Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धनाजी-संताजीची जोडी, राज ठाकरेंचा प्रस्ताव आला तर…

“शिंदे फडणवीस जोडी धनाजी संताजी ची जोडी आहे. दमदार काम करत आहे” असं वक्तव्य भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. नागपूर येथे ते पत्रकारांशी बोलते होते. ते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हि जोडी राज्यातील धनाजी संताजीची जोडी आहे. दोन्ही नेते दमदार काम करत आहे. सकाळी ७ ते रात्री १ […]

Chandrasekhar Bawankule

Chandrasekhar Bawankule

“शिंदे फडणवीस जोडी धनाजी संताजी ची जोडी आहे. दमदार काम करत आहे” असं वक्तव्य भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. नागपूर येथे ते पत्रकारांशी बोलते होते. ते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हि जोडी राज्यातील धनाजी संताजीची जोडी आहे. दोन्ही नेते दमदार काम करत आहे. सकाळी ७ ते रात्री १ पर्यंत काम करण्याचे आमचे संस्कार आहेत. असंही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा : Old Pension Scheme : राज्यकर्त्यांनी भविष्याचा विचार करावा, घोषणा करून निवडणुका जिंकता येतील पण…

राज ठाकरेंचा प्रस्ताव आला तर…

काल मनसेचा वर्धापनदिन साजरा झाला. त्यावेळी राज ठाकरे यांनी आगामी काळात महापालिका, विधानसभा लक्ष्य असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे येत्या काळात मनसे कोणत्या पक्षासोबत जाणार आणि कोणाविरोधात लढणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावेळी राज ठाकरे आगामी निवडणूका भाजपसोबत लढतील अशी शकयता वर्तवली जात आहे. त्यावर राज ठाकरे यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार असल्याचं मत व्यक्त केलं.

ते म्हणाले की, राज ठाकरेंनी काय निंर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. कुणी पक्षात येण्यासाठी उत्सूक असेल, उद्या तुम्ही म्हटलं पक्षात येतो तर मी नाही म्हणणार नाही. पण आजच्या तारखेपर्यंत राज ठाकरे यांच्याकडून युतीचा प्रस्ताव आला नाही. पण तसा प्रस्ताव आला तर निश्चित चर्चा करू”

एक दिवस तुम्हाला पण ओहोटी येईल

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सतराव्या वर्धापनदिनाच्या भाषणात राज ठाकरे यांनी भाजपलाही टोला लगावला आहे. भाजपने पण ते लक्षात ठेवावं की जरी आज तुमची सत्ता असली पण एक दिवस तुम्हाला पण ओहोटी येईल. ज्या काँग्रेसने देशावर 70 वर्ष राज्य केले त्यांची आज काय अवस्था आहे हे भाजपने विसरू नये, असे ठाकरे म्हणाले.

हेही वाचा :  गडाखांच्या ताब्यातला नेवासा दूध संघ अखेर बंद करण्याचा निर्णय; दूध उत्पादक आणि कामगारांचा प्रश्न ऐरणीवर 

दिवस बदलत असतात आज जरी भाजपचे दिवस असले तरी उद्या दुसऱ्या कोणाचे दिवस येतील हे भाजपने लक्षात ठेवले पाहिजे. जे लोक आज सत्तेमुळे तुमच्याकडे आले आहेत, तेच लोक सत्ता गेल्यावर तुम्हाला सोडून जातील, असा देखील टोला राज ठाकरे यांनी यावेळी लगावला.

Exit mobile version