Chadrashekhar Bawankule On Maharashtra politics : राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) दोन्ही गटाचा युक्तीवाद काही दिवसांपूर्वीच संपला आहे. कोर्टाने राखून ठेवलेला निर्णय कोणत्याही दिवशी जाहीर होऊ शकतो. जर सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात गेला आणि एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरले तर, भाजपने कोणती व्यवस्था केली आहे? यावर भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांनी भाजपचा ‘प्लॅन बी’ सांगितला आहे. आमच्याकडे 184 चा आकडा असल्याचे त्यांनी सांगितले.
बावनकुळे म्हणाले, सुप्रीम कोर्टाचा निकाल काहीही येऊ द्या. निकाल आल्यावर विरोधकांनी सांगितले की हे सरकार अल्पमतात आहे आणि बहुमत सिद्ध करा. तर 184 मते मिळतील अशी स्थिती आहे. आमचे गणित अॅटोमॅटिक जमते. त्यामुळे काही घाबरण्याचे कारण नाही. सरकार वाचवण्साठी राष्ट्रवादी किंवा अन्य कोणाचीही मदत घ्यावी लागणार नाही. शेवटी भाजप-शिवसेना युती ही महत्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.
Sanjay Raut : अजित पवार कोणाचे मांडलिक म्हणून काम करणार नाहीत, राऊतांच खोचक उत्तर
ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर वर्णभेदी टीका केली होती. यावरुन बावनकुळे यांनी भास्कर जाधव यांना इशारा दिला आहे. बावनकुळे म्हणाले, व्यक्तीगत टीका कधीही सहन केली जाणार नाही. सभा घेऊन विचार मांडा, विकास कामांवर बोला पण आमच्या नेत्यांबद्दल कोणी व्यक्तीगत बोलले तर आम्ही गप्प बसणार नाही. व्यक्तीगत टीका करणाऱ्याला निपटण्यासाठी भाजप सक्षम आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.
अजित पवार भाजपबरोबर जाणार का ? ; सुप्रिया सुळे म्हणाल्या, याचं उत्तर..
भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे पाथर्डीत एका कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यावेळी दोघांनी एकमेकांची स्तुती देखील केली. यावरुनच बहिण-भावांमधील वाद संपल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. यावर भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की एका परिवारातील दोन बहिण-भाऊ वेगवेगळ्या पक्षात असले तरी सामाजिक कामात एकत्र येत आहेत हे कार्यकर्त्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. राजकीय दृष्ट्या ते एकत्र येतील का? यावर मला आता बोलायचे नाही. परिवारात कटुता नको हेच महत्वाचे आहे.