Download App

मुंडे-कोकाटेंचा राजीनामा…अण्णा हजारेंच्या मागणीवर सरकारचा निर्णय, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

  • Written By: Last Updated:

Chandrashekhar Bawankule On Anna Hazare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) पुन्हा एकदा आक्रमक झालेत. त्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. यावर आता भाजप नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची (Chandrashekhar Bawankule) प्रतिक्रिया समोर आलीय. विरोधकांकडून देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि माणिकराव कोकाटेंच्या (Manikrao Kokate) राजीनाम्याची मागणी केली जातेय.

अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे, त्याबद्दल आपले मु्ख्यमंत्री ऐकून घेतील. सरकार त्यावर निर्णय करेल, असं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे म्हणाले की, आरोपांना तोंड देणाऱ्या मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. मंत्रिमंडळामध्ये असलेल्या मंत्र्यांवर आरोप झाल्यास नैतिक जबाबदारी म्हणून पहिल्यांदा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यामुळे त्या व्यक्तीची प्रतिमा चांगली होते, असं अण्णा हजारेंनी स्पष्ट केलंय.

पंतप्रधानांचं कौतुक केलं तर तुम्ही ‘भक्त’, प्रिती नेमकी कोणावर संतापली? धक्कादायक कारण…

ते म्हणाले की, जनता आपल्याला बघून अनुकरण करत असते. त्यामुळे आरोप असलेल्या लोकांना मंत्रीमंडळात घेण्याआधी विचार करणं देखील गरजेचं आहे. मंत्रिमंडळात सामील करताना कोणाला घ्यावं, कोणाला घेवू नये हे देखील ठरवलं पाहिजे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी अण्णा हजारेंच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय करतील, असं स्पष्ट केलंय.

माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की, महायुती सरकारच्या पुढाकाराने 20 लक्ष घर मंजूर झाली. 20 लाख घरांचं आवर्तन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. सर्व लाभार्थ्यांना आज चेकचे वितरण केले जाईल. इथल्या दोन पालकमंत्र्यांचा प्रश्न हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मिळून सोडवतील.

Video : पोलीस अधीक्षक बदलले असले तरी, खालची यंत्रणा तीच; मस्साजोगमध्ये धस नेमकं काय म्हणाले?

एकनाथ शिंदे महायुतीत नाराज नाहीत. ते महायुतीतील महत्त्वाचे घटक आहेत. शिंदे महायुतीला मजबूत करण्यासाठी काम करतात. एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये, असं आवाहन देखील बावनकुळेंनी केलंय. विरोधकांना नामोहर करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी नेहमी केलंय. हिंदुत्वाचा वसा घेतलेलं काम ते करत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचं काम शिंदे करत असून त्यामुळेच भाजप सेना युती अधिक मजबूत झालीय. आता राजकारण नको, लोकांना जी आश्वासने दिली ती पूर्ण करायची आहे. विकसित महाराष्ट्र व्हावा यासाठी आता महायुती काम करत असल्याची भूमिका बावनकुळेंनी स्पष्ट केलीय.

 

follow us