Chandrasekhar Bawankule : काल बारामतीत शरद पवारांवर गंभीर आरोप केल्यानंतर आज कुठलीही पूर्वसूचना न देता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचले. बराच वेळ वेटिंग केल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या भेटीमुळं राजकीय वर्तुळाच चर्चांना उधान आलं. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. भुजबळ-पवार भेटीवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) प्रतिक्रिया दिली.
Lifeline Teaser: अशोक मामाच्या नव्या ‘लाईफलाईन’चा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित
चंद्रशेखर बावनकुळेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. शरद पवार-भुजबळ भेटीविषयी बोलतांना बावनकुळे म्हणाले, छगन हे भुजबळ महायुतीचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. ते कुठल्याही प्रकारचा वेगळा निर्णय घेणार नाहीत. महायुतीचे नुकसान होईल असा निर्णय ते घेणार नाहीत. उलट छगन भुजबळ हे महायुती कशी एकसंध राहिल यासाठी प्रयत्न करत असतात. महायुतीची एकजूट कायम राहावी यासाठी त्यांचे प्रयत्न असतात, असं बावनकुळे म्हणाले.
Government Schemes : कांदाचाळ अनुदान योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
पुढं बोतलांना ते म्हणाले की, कोणत्याही नेत्याने शरद पवारांची भेट घेण्यात गैर काहीच नाही. आम्ही अनेकदा त्यांना किंवा आमच्या वरिष्ठांना भेटत असतो. काही विषय असे मानतात, ज्यासाठी वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. राज्याच्या हितासाठी वरिष्ठांना भेटण्यात काही गैर नाही. या भेटीचा कुठलाही राजकीय अर्थ काढू नये, असं बावनकुळे म्हणाले.
संजय शिरसाट काय म्हणाले?
अधिवेशन काळात आरक्षणासंदर्भात बोलावलेल्या बैठकीला विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे छगन भुजबळ साहेबांनी एक पाऊल पुढे टाकत शरद पवार साहेबांची भेट घेतली. शरद पवार यांनीही दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आपण याभेटीकडे सकारात्मकतेने पाहाययला पाहिजे, असं संजय शिरसाट म्हणाले.