Chandrashekhar Bawankule : राज्य सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारकडून योजनांच्या प्रसिद्धीसाठी 270 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीयं. त्यावरुन विरोधकांकडून टीकेचा सूर आवळण्यात येत आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विरोधकांवर चांगलेच कडाडले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 700 कोटी जाहिरातींवर खर्च करण्यात आल्याचं प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिलंय. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यपाल पदासाठी ‘यूपी’ अन् ‘दक्षिण भारत’च फेव्हरेट; बिगर भाजप नेत्यांनाही लॉटरी..
बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले, सरकारकडून घोषणा करण्यात आलेल्या योजना सर्वच घटकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून प्रसिद्धी करण्यात येत आहे. उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री असताना 700 कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले आहेत. मोठ्या योजनांच्या जाहिराती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीच केल्या जात असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय.
भाजपने जनतेला अभिमन्यूसारख चक्रव्यूहात अडकवलं, मोदी-शाह-अदानींचं नाव घेत राहुल गांधींचे टीकास्त्र
यावेळी बोलताना बावनकुळे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीवारीबद्दलच्या अनेक नाट्यमय घडामोडी सांगितल्या आहेत. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केलीयं. राऊतांच्या या टीकेलाही बावनकुळेंनी ठासून उत्तर दिलंय. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार योग्य पद्धतीने आणि मनमोकळेपणाने सांगतात, त्यांनी जीवनातील घडामोडी सांगितल्या आहेत, त्यावरुन राजकारण करण्याची गरज काय? संजय राऊत सकाळी 9 वाजता झोपेतून उठून नौटंकी करणार असल्याची जहरी टीका बावनकुळे यांनी राऊतांवर केलीयं.
मुख्यमंत्री शिंदे हे मौलवीच्या वेशात दिल्लीत जाऊन मंत्री अमित शाहा यांना भेटत होेते. अजित पवार आणि शिंदे यांनी बनावट ओळखपत्रे बनवलेली आहेत. यासंदर्भात खुद्द अजितदादांनीच या नाट्यकलेबाबत सांगितलं. या प्रकरणाची एएनआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांच्याकडून करण्यात आली. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं.
सावरकरांचा मुद्दा निवडणुकीचा नाही…
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा घेऊन भाजपा निवडणूक लढेल, हा का विचार करता? सावरकरांचा मुद्दा आमच्यासाठी निवडणुकीचा मुद्दा नाही. डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेला कसं न्याय देऊ शकते, हे आम्ही लोकांना सांगणार आहोत, हा आमचा मुद्दा आहे. इंडी आघाडीचा खोटारडेपणा आम्ही उघड पाडणार आहोत. आमच्या जवळ कामाची शिदोरी, त्यांच्याजवळ फेक नॅरेटिव्ह असून आम्ही योजना आणि विकासाच्या माध्यमातून मते मागू महाविकास आघाडीला मत म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान करणे असल्याचंही बावनकुळे म्हणाले आहेत.