Download App

‘इमेज खराब करण्याचा प्रयत्न असेल तर लखलाभ’; भारतात पाऊल ठेवताच बावनकुळेंनी सुनावलं

Chandrashekhar Bawankule on Sanjay raut : आम्ही काम करुन इमेज तयार केलीयं, खराब प्रयत्न करण्याचा प्रयत्न असेल तर तुम्हाला लखलाभ, शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांना सुनावलं आहे. दरम्यान, बावनकुळे कुटुबियांसोबत मकाऊ दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, बावनकुळेंचा कसिनो खेळतानाचा फोटो राऊतांनी पोस्ट केला होता. त्यावरुन राज्यात प्रचंड राजकारण तापलं. आता भारतात पाऊल ठेवताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांना सुनावलं.

कृषी सेवा केंद्र संचालकांना दिलासा, बोगस बियाणे विरोधातील कायद्यांचा त्रास होणार नाही; कृषिमंत्री मुंडेंची ग्वाही

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ३४ वर्षांपासून राजकीय, सामाजिक जीवनात आहे. भाजपा-शिवसेना युतीत अनेक वर्षे काम केले. शिवसेनेतील अनेक नेते मला ओळखतात. विधिमंडळात अनेक मित्र मंडळी आहेत. चारवेळा आम्ही निवडून आलो आहोत. अशा फोटोंच्या आधारावर कोणाची इमेज खराब करता येत नाही, असं मला वाटतं. ३४ वर्षे काम करून आम्ही इमेज तयार केली आहे. त्यामुळे हा प्रयत्न केला असेल तर त्यांचा प्रयत्न त्यांना लखलाभ, असल्याचं म्हणत बावनकुळेंनी राऊतांना सुनावलं आहे.

Animal Movie: ‘अ‍ॅनिमल’ प्रमोशनदरम्यान इंडस्ट्रीत बॉबी देओलची स्टाइल ठरतेय आयकॉन

तसेच यामुळे माझ्या परिवाराला त्रास झाला. माझ्या मुलीने आणि सुनेने माझ्याकडून तीन दिवसांचा वेळ घेऊन नियोजन केलं होतं. हाँकाँग या पर्यटनस्थळी गेलो. सगळं चांगंल चालू असताना व्यक्तिगत जीवनात आमच्या परिवाराला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न झाला. राजकारणात काम करताना असे प्रयत्न चुकीचे वाटतात. त्यामुळे मला आणि परिवाराला वाईट वाटलं, असंही ते म्हणाले.

‘एक अपघात अन्…’; पंकज त्रिपाठींच्या ‘कडक सिंग’ सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

सगळ्यांनाच माहितेय की कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर कॅसिनो क्रॉस करावं लागतं. मकाऊ किंवा हाँककाँगला गेल्यानंतर कॅसिनो क्रॉस करूनच सगळीकडे जावं लागतं. कोणीतरी असे प्रयत्न करायचे आणि ३५० कोटींचा आरोप केला. एक रुपयाही तुमच्या बॅगेत असला तर तीन तीन वेळा चेकिंग करावी लागते, असंही त्यांनी पुढे स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?
19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ,veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? ते म्हणतात फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत. त्यांच्या सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणतात कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल, झाला तेवढा तमाशा पुरेसा असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Tags

follow us