‘माझ्याकडं 27 फोटो अन् 5 पाच व्हिडिओ, भाजपचं दुकानच बंद पडेल’; संजय राऊत कडाडले

‘माझ्याकडं 27 फोटो अन् 5 पाच व्हिडिओ, भाजपचं दुकानच बंद पडेल’; संजय राऊत कडाडले

Sanjay Raut : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांचा मकाऊमधील कथित जुगार खेळतानाचा फोटो विरोधकांकडून व्हायरल करण्यात आला आहे. या व्हायरल फोटोनंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक कथित व्हिडिओ व्हायरल केला आहे. या कथित व्हिडिओमध्ये नाना पटोले एका मुलीसोबत असल्याचं दाखवण्यात आलंय. राजकीय नेत्यांमध्ये सध्या फोटोवॉर सुरु असल्याची परिस्थिती असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) भाजपवर चांगलेच कडाडले आहेत.

आम्ही फोटोवरुन विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे द्या, ते कुटुंबासोबत म्हणताहेत पण फॅमिली चायनीज आहे काय? माझ्याकडे 27 फोटो आणि 5 व्हिडिओ आहेत, पण आमच्यात माणुसकी आहे, म्हणून थोडी गंमत केलीयं, सगळंच बाहेर काढलं तर भाजपचं दुकानच बंद पडणार असल्याची जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली आहे.

इतिहासाचा दाखला, मंत्र्यांवर निशाणा; पुण्याच्या खराडीत जरांगेंनी पुन्हा फुंकलं रणशिंग

राऊत म्हणाले, आम्ही कोणाचं नाव घेतलं नाही. महाराष्ट्रातील एक नेते दिसत आहेत. त्या व्यक्तीने सांगावं की तो मी नव्हे. लोकं ओळखतात त्यांना असं मला कळलं. तेलगीने एका दिवसात 1 कोटी उडवल्याचं मला माहिती होतं. पण, महाराष्ट्रातील एक माणूस मकाऊमध्ये साडेतीन कोटी उडवतो. म्हणजे अच्छे दिन आले आहेत, असा टोमणा संजय राऊतांनी लगावला.

महायुती सरकार केवळ घोषणाबाज…आकडे कोटींची अन् कामे शून्य… तनपुरेंचा हल्लाबोल

मी कोणाच्याही व्यक्तिगत आनंदावर विरजण घाऊ इच्छित नाही. पण, सध्या महाराष्ट्रात काय सुरु आहे. सामाजिक परिस्थिती काय आहे, दुष्काळ परिस्थिती आहे. तुम्ही जितकं खोटं बोलाल तितकं तुम्ही फसाल. फोटो आणि व्हिडिओ समोर आणून भाजपचं दुकान बंद पाडू शकतो. पण, मी तसं करणार नाही. २०२४ पर्यंत त्यांचे दुकान चालले पाहिजे, अशीही खरमरीत टीका संजय राऊतांनी केली आहे.

दरम्यान, आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. त्यामुळे आम्ही व्ययक्तिक टीका करत नाही. पण, सुरुवात कोणी केली. त्यामुळे आम्ही दाखवून दिलं की आम्हीही हात घालू शकतो. त्यांच्याकडे महाराष्ट्रात ईडी, सीबीआय असेल पण आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी-सीबीआय आहे. नाना पटोले अत्यंत योग्य बोलले. मी त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे, असं राऊत म्हणाले.

एकीकडे राज्यात मराठा आरक्षणासह धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष परदेशात कसिनो खेळताहेत, भाजपच्या नेत्यांना इथल्या जनतेचं काही एक देणं घेण नाही, चंद्रशेखर बावनकुळेंकडे परदेशात कसिनो खेळण्यासाठी पैसे आले कुठून? या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी बावनकुळेंवर सडकून टीका केलीयं.

19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ,veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? ते म्हणतात फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत. त्यांच्या सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणतात कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल, झाला तेवढा तमाशा पुरेसा असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube