‘बावनकुळेंना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न’; विरोधकांच्या टीकेनंतर दरेकर सरसावले

‘बावनकुळेंना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न’; विरोधकांच्या टीकेनंतर दरेकर सरसावले

Pravin Darekar : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) सध्या कुटुंबियांसोबत मकाऊ दौऱ्यावर आहेत. याचवेळी एका हॉटेलमध्ये कसिनो खेळतानाचा कथित फोटो व्हायरल करण्यात आला आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचा हा कथित फोटो ठाकरे गटासह काँग्रेसकडून एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोसोबत विरोधकांनी बावनकुळेंवर सडकून टीकाही केली आहे. याचं टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे आमदार प्रविण दरेकर(Pravin Darekar) पुढे सरसारवले आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंना जाणीवपूर्वक बदनाम करण्याच्या प्रयत्नाने हा फोटो घेतला असल्याचं स्पष्टीकरण दरेकरांनी दिलं आहे. यासंदर्भात दरेकरांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.

प्रविण दरेकर पोस्टमध्ये म्हणतात, “भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होते. तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राउंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आहे आणि त्याच्याच शेजारी हा कसिनो आहे. या परिसरात बावनकुळेजी कुटुंबासह होते. त्यावेळी कुणीतरी काढलेला हा फोटो आहे.
केवळ बदनामी करण्याच्या हेतूने हा फोटो घेतलेला आहे. त्यांच्या शेजारी त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील बसले होते. मात्र, जाणीवपूर्वक फक्त एकट्या बावनकुळे साहेबांचा फोटो टाकला,” असं प्रत्युत्तर प्रविण दरेकरांनी दिलं आहे.

IND vs AUS Final : …म्हणून टीम इंडियाचा पराभव झाला; नेटकऱ्यांकडून अहमदाबादचे प्रेक्षक टार्गेट

एकीकडे राज्यात मराठा आरक्षणासह धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष परदेशात कसिनो खेळताहेत, भाजपच्या नेत्यांना इथल्या जनतेचं काही एक देणं घेण नाही, चंद्रशेखर बावनकुळेंकडे परदेशात कसिनो खेळण्यासाठी पैसे आले कुठून? या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी बावनकुळेंवर सडकून टीका केलीयं. 19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ,veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? ते म्हणतात फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत. त्यांच्या सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणतात कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल, झाला तेवढा तमाशा पुरेसा असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे याआधीही अनेकदा विधाने करुन चांगलेच कोंडीत सापडल्याचं पाहायला मिळाले आहेत. आता परदेश दौऱ्यात ते कसिनो खेळत असल्याचा दावा विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. अशातच विरोधकांच्या टीकेवर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. मकाऊच्या हॉटेलमधील ग्राऊंड फ्लोअरवर कसिनो आणि रेस्टॉरंट एकच आहे. आम्ही जेवण केल्यानंतर बसलो असतानाच कुणीतरी हा फोटो काढला असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube