Download App

Santosh Deshmukh Murder : तिन्ही संस्थांचा तपास पूर्ण झाल्यानंतर मुडेंविषयी निर्णय घेऊ; बावनकुळेंचं वक्तव्य

संतोष देशमुख हत्येप्रकरणी तिन्ही संस्थांचा तपास पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारला योग्य वाटल्यास मंत्री धनंजय मुंडेंबाबत निर्णय घेतला जाईल

  • Written By: Last Updated:

Chandrashekhar Bawankule : सरपंसंतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांची गेल्या महिन्यात निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंड (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचं नाव आल्याने यावरुन विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाष्य केलं.

‘हश मनी केस’ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा, तुरुंगात जावे लागणार नाही 

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तिन्ही संस्थांचा तपास पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारला योग्य वाटल्यास मंत्री धनंजय मुंडेंबाबत निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले.

बावनकुळे हे आज नोंदणी मुद्रांक शुल्क विभाग आणि जमाबंदी विभागांचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांना मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, तपासात काही आढळून आलं तर राजीनामा मागितला जाऊ शकतो. आता याबाबत चर्चा करणं गरजेचं नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. तिन्ही संस्थांचा योग्य तपास झाल्यानंतर राज्य सरकारला वाटले तर धनंजय मुंडेंबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. धनंजय मुंडे यांच्याबद्दल चर्चा करणे योग्य नाही. कोणत्याही व्यक्तीची बदनामी केली जाऊ नये. कोणालाही दोष देऊ नये. मात्र, ज्या दिवशी दोषी आडळतील, त्या दिवशी कोणालाही सोडले जाणार नाही, असं ते म्हणाले.

पुढं ते म्हणाले की,गुन्हा झाल्यानंतर गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी जे काही लागतं, ते सरकार करत आहे. गृहखाते प्रभावीपणे आणि पारदर्शपणे काम करत आहे. कुठल्याही व्यक्तीला वाचवण्याचं काम केलं जात नाही, असंही बावनकुळेंनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरेंनी अलीकडे फडणवीस यांची भेट घेतली. यावर भाष्य करतांना बावनकुळे म्हणाले की, जर ते कोणत्याही कामांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटले असतील तर त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. अनेक विषय राजकारणाच्या पलीकडे आहेत. आदित्य ठाकरे यांनी चांगल्या कारणासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणे यात काहीही गैर नाही, असं ते म्हणाले.

 

follow us