Download App

आम्हाला मान्य नाही, सरकारमध्ये राहुनही काम करता येतं; बावनकुळेंची फडणवीसांना साद

आम्हाला मान्य नाही, सरकारमध्ये राहुनही काम करता येतं, अशी साद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीसांना घातलीयं.

Chandrashekhar Bawankule : देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnvis) निर्णय आम्हाला मान्य नसून सरकारमध्ये राहुनही संघटनेचं काम करता येतं, अशी साद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातलीयं. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मला सरकारमधून जबाबदारीतून मुक्त करण्याची भावना व्यक्त केलीयं. त्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भूमिका मांडलीयं.

मोहोळांच्या विजयात पुनित बालन यांचा कसबा पॅटर्न ठरला यशस्वी; मोहोळांचं केलं जंगी स्वागत

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांची महत्वपूर्ण जबाबदारी असून फडणवीस यांनी सरकारमध्ये राहुनचं संघटनेला पुढे न्यावं. त्यांनी सरकारमध्ये राहुनच सरकारला मदत करण्याची गरज आहे. ही अपेक्षा आम्हाला फडणवीसांकडून असून ते आमची अपेक्षा मान्य करतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलायं.

मोदी सरकारच्या 19 मंत्र्यांना पराभवाचा धक्का; दानवे, भामरे, कपिल पाटलांची संधी हुकली

सरकारमध्ये असताना संघटनेचं काम करता येत नाही, अशी देवेंद्र फडणवीस यांची मानसिकता असून ही भावना त्यांनी व्यक्त केलीयं. देवेंद्र फडणवीस यांनी भावना आमच्यासह वरिष्ठ नेते मान्य करणार नसल्याचं बावनकुळेंनी सांगितलंय. लोकसभा निडवणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याचं आम्हाला दुखं: आहे. मात्र, फडणवीस सरकारमध्ये राहुन संघटनेला वेळ देतील त्यानंतर निवडणुकीत ज्या कमी जाणवल्या आहेत. त्यावर आम्ही काम करणार आहोत, फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्हाला यश मिळणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं आहे.

दहा वर्षांनंतर भाजपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा पंजा; गुजरातेत एका जागेवर काँग्रेसची आघाडी

फडणवीसांनी वरिष्ठांकडे काय विनंती केलीयं?
महाराष्ट्रातील अपयशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपुमख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी विनंती केंद्रीय नेतृत्वाला केलीयं. लोकसभेच्या पराभवानंतर आगामी विधानसभेसाठी मला पक्षात अंतर्गत काम करायचंय, त्यासाठी मी पक्षश्रेष्टीकडे मागणी करणार आहे, त्यांची भेट घेणार आहे. विधानसभेच्या दृष्टीने फक्त काम करण्यासाठी मला सरकार मधून मोकळा करा, अशी ही मागणी मी पक्षश्रेष्ठींकडे करणार आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे मला मुक्त करण्याबाबतची विनंती केलीयं, त्यामुळे आता फडणवीसांच्या विनंतीवर केंद्रीय नेतृत्वाकडून कोणती भूमिका घेतली जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us