दहा वर्षांनंतर भाजपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा पंजा; गुजरातेत एका जागेवर काँग्रेसची आघाडी

दहा वर्षांनंतर भाजपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा पंजा; गुजरातेत एका जागेवर काँग्रेसची आघाडी

Gujarat Lok Sabha Elections Results : भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असणाऱ्या गुजरातमध्ये यंदा भाजपला क्लीन स्वीप करण्यात अपयश आलं आहे. राज्यातील 26 पैकी 25 मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया पोरबंदर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. एका मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेस उमेदवार निलेश कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर सूरत मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाले होते. सात टप्प्यात झालेल्या 25 जागांसाठी 7 मे रोजी मतदान झाले होते.

गुजरातच्या अधिकाऱ्याने CM शिंदेंच्या गावाजवळ खरेदी केली तब्बल 620 एकर जमीन? जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू

गुजरातमधील बनासकांठा मतदारसंघात मतमोजणीत चुरस वाढत चालली आहे. काँग्रेस उमेदवार जेनीबेन ठाकोर 6 लाख 58 हजार 847 मतांनी आघाडीवर आहेत. भारतीय जनता पार्टीच्या रेखा चौधरी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आता फक्त अंतिम निकालाची घोषणा होणे बाकी राहिले आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. मागील दहा वर्षांच्या काळानंतर काँग्रेस या मतदारसंघात खाते उघडणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार काँग्रेसच्या जनीबेन ठाकोर आघाडीवर आहेत.

बनासकांठा हा भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. 2019 मध्ये भाजपाच्या परबतभाई पटेल यांनी काँग्रेसच्या पार्थी भटोल यांचा 3 लाख 68 हजार मतांनी पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा सुपडा साफ केला होता. येथील ठाकोर समाजाचा पाठिंबा मिळाल्याने जनीबेन ठाकोर यांचा या मतदारसंघातून विजय होताना दिसत आहे. मागील 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. 2009 मध्ये गुजरातमधील 26 पैकी 11 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या तर 14 जागा भाजपने जिंकल्या होत्या.

Kangana Ranaut: ‘पंगाक्वीन’ अभिनेत्री कंगना निवडणुकीच्या रणात चमकणार! मंडी लोकसभा मतदार संघात आघाडीवर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज