Download App

‘छगन भुजबळ अन् अजित पवारांची एकच भूमिका’; बच्चू कडूंचं मोठं विधान

Bacchu Kadu On Chagan Bhujbal & Ajit Pawar : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन चांगलचं वातावरण तापलं आहे. अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनाने वेगळं वळण घेतलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मराठा आंदोलकांकडून लावून धरण्यात आली आहे. त्यासाठी उपोषणे, आंदोलने करण्यात आली. त्यानंतर सरकारनेही मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं. अशातच ओबीसी नेते जहाल भूमिका घेत आहेत. त्यावर आता प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू(Bacchu Kadu) यांनी मोठं विधान केलं आहे.

छगन भुजबळ(Chagan Bhujbal) आणि अजित पवारांची(Ajit Pawar) भूमिका सारखीच असल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत. त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बच्चू कडू म्हणाले, छगन भुजबळ वरिष्ठांशिवाय बोलत नाहीत. छगन भुजबळ आणि अजित पवारांची भूमिका सारखीच आहे. भाजपही ओबीसींचं नेतृत्व करु पाहत आहे. भाजपसोबत काँग्रेसही ओबीसींचं नेतृत्व करु पाहतयं, पण भाजप आणि काँग्रेसला छगन भुजबळ भारी पडले आहेत. भुजबळांनी या दोघांनाही मागे टाकलं असून भुजबळ हेच ओबीसींचे नेते असल्याचं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.

Animal Trailer: अनिल कपूर अ‍ॅनिमलच्या ट्रेलर लाँचला का गेले नाही? अखेर समोर आलं सत्य…

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर सरकार आणि ओबीसी संघटनांच्या नेत्यांमध्ये सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. या बैठकीत झालेल्या चकमकीनंतर राज्यात भुजबळ-पवारांमध्ये वाद झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेते प्रकाश राज यांना ED चे समन्स, नेमकं काय आहे प्रकरण?

मराठा आरक्षणासाठी जालन्यात सुरु असलेल्या उपोषणादरम्यान, आमदार कडू यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं. त्यावेळी बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले, 75 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण भेटलेले नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असे काही जण बोंबलत आहेत.

IAS अभिषेक सिंह यांचा पाटेकरांना इशारा, व्हिडिओ जारी करून म्हणाले, ‘युपीत याल तेव्हा…’

मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास सरकारवर चांगले परिणाम होणार नाहीत, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे. मराठा समाज कुणबी नाही का ? तो राजपूत गुजराती आहे का ? मराठा समाज अमेरिकन, जपानीज आहे का ? हेच तुम्हाला सांगता येत नाही तर उलट्या बोंबा का मारत आहे, असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला होता.

Tags

follow us