मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेते प्रकाश राज यांना ED चे समन्स, नेमकं काय आहे प्रकरण?

  • Written By: Published:
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेते प्रकाश राज यांना ED चे समन्स, नेमकं काय आहे प्रकरण?

Prakash Raj : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांना अंमलबजावणी संचालनालयने (ED) समन्स बजावले आहे. प्रकाश राज हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि बिनधास्तपणासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेकदा मोदी सरकारवर तीव्र शब्दात निशाणा साधला होती. दरम्यान, आता प्रणव ज्वेलर्सच्या (Pranav Jewellers) पोंझी योजनेशी संबंधित प्रकणात त्यांना ईडीने समन्स पाठवले.

तुषार दोषींच्या बदलीला स्थगिती? मंत्री दीपक केसरकरांनी केली मागणी 

पोंझी योजनेशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने प्रकाश राज यांना समन्स बजावले आहे. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूतील त्रिची येथील प्रणव ज्वेलर्सच्या जागेवर ईडीने छापा टाकला होता. प्रणव ज्वेलर्समध्ये पीएमएलए अंतर्गत शोध मोहिमेदरम्यान अशी अनेक कागदपत्रे सापडली आहेत. ज्यामध्ये सुमारे 23 लाख 70 हजार रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांची माहिती मिळाली. एवढेच नाही तर ईडीने झडतीदरम्यान 11 किलो 60 ग्रॅम सोन्याचे दागिनेही जप्त केले.

आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित वेतन द्या; मंत्री सावेंचे निर्देश 

प्रकाश राज हे प्रणव ज्वेलर्ससाठी जाहिरात करतात. या ज्वेलर्सच्या कंपनीच्या जाहिरातीची ते चेहरा ठरले आहेत. प्रणव ज्वेलर्सवर केलेल्या छापेमारीनंतर तपास यंत्रणेने आता प्रकाश राज यांना नोटीस पाठवली आहे. आता या प्रकरणी ईडी प्रकाश राज यांची चौकशी करणार आहे. त्यांना पुढील आठवड्यात चेन्नईतील ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रकाश राज यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे शाब्दिक हल्ला केला आहे. त्यामुळंच त्यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आल्याचं चाहते म्हणत आहेत.

प्रकाश राज यांनी बॉलीवूड व्यतिरिक्त साऊथ फिल्म इंडस्ट्रीतही विशेष ठसा उमटवला आहे. केजीएफ, वॉन्टेड, वारिसू यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. सिंघम या चित्रपटामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्यांनी जयकांत शिखरे यांची भूमिका साकारली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube