आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित वेतन द्या; मंत्री सावेंचे निर्देश
मुंबई : राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या आश्रमशाळांतील (Ashram schools) शिक्षकांचे पगार काही काळापासून रखडले आहेत. या प्रकरणी अनेक तक्रारी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना प्राप्त झाल्या होत्या. दरम्यान, राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरमहा 1 ते 5 तारखेपर्यंत नियमित वेतन अदा करावे, असे निर्देश मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी संबंधित विभागाला दिले.
अमोल कोल्हेंकडून अजितदादांच्या भेटीवर स्पष्टीकरण; म्हणाले, आभार मानण्यासाठी गेलो होतो
आश्रम शाळांतील शिक्षकांना वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळं त्यांची नेहमीच ओरड असते. यामुळं राज्यातील इतर शिक्षकांप्रमाणेच आश्रमशाळांतील शिक्षकांनाही 1 तारखेला वेतन मिळावे, अशी मागणी होत होती. यानंतर आज राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी संघटनेच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
Rahul Gandhi : ‘पनौती’ शब्द निवडणूक आयोगालाही खटकला; BJP च्या तक्रारीची 24 तासांत दखल
विजाभज अनुदानित, माध्यमिक, उच्च माध्यमिक कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी शालेय शिक्षण विभागाप्रमाणे करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच या आश्रमशाळातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दि.१ ते ५ तारखेपर्यंत नियमित अदा करून वित्त आयोगातील फरक देण्यात यावा.आणि अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे, असे मंत्री सावे यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला आमदार विक्रम काळे, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव विरेंद्र सिंह, उपसचिव कैलास सोळुंखे, उपसंचालक वासुदेव पाटील, लातूर उपसंचालक दि. व. राठोड, अमरावती प्रादेशिक उपसंचालक विजय साळवे, नाशिक प्रादेशिक उपसंचालक भगवान वीर, आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे राज्य अध्यक्ष बालाजी मुंडे, राज्य सरचिटणीस किशन पुंड, किरण पाटील, सुकुमार जगताप, कुलदीप जवंजाळ आदी उपस्थित होते.
मंत्री सावे यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन 1 ते 5 तारखेच्या दरम्यान द्यावे, असे निर्देश दिल्यानं अध्यपनाचे काम करणार्या अनेक शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.