अमोल कोल्हेंकडून अजितदादांच्या भेटीवर स्पष्टीकरण; म्हणाले, आभार मानण्यासाठी गेलो होतो

अमोल कोल्हेंकडून अजितदादांच्या भेटीवर स्पष्टीकरण; म्हणाले, आभार मानण्यासाठी गेलो होतो

Amol Kolhe News : शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांनी आज मंत्रालयात उपमुख्यंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत होत्या. या भेटीवर अखेर खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानण्यासाठी गेलो असल्याचं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातील एक पोस्ट त्यांनी एक्सवर शेअर केलीयं.

पोस्टमध्ये अमोल कोल्हे म्हणाले, “उत्तर-दक्षिण महाराष्ट्राला जोडणारा, शिरूर लोकसभा मतदारसंघाची भाग्यरेषा बदलणारा पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प व पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सर्व उपचार माफक दरात व्हावे यासाठी दृष्टिक्षेपात असलेला माझा ड्रीम प्रोजेक्ट इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पास गती मिळावी व मतदारसंघातील अनेक मंजूर विकासकामांसाठी निधी मिळावा यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली.

वर्ल्डकपदरम्यान भारतीय क्रिकेटपटूंना भगवी जर्सी घालण्याचा प्रयत्न; ममतांचा भाजपवर गंभीर आरोप

सोबतच खासदार झाल्यापासून वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या स्मारक विकासासाठी जो पाठपुरावा सुरू होता, त्याला अजितदादांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानले! शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या भल्यासाठी निरंतरपणे पाठपुरावा केलेल्या सर्व मागण्यांवर अजितदादांकडून सकारात्मक कार्यवाही होईल, हीच अपेक्षा!” असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

Madha Lok Sabha : माढा मतदारसंघात मोहिते-पाटलांचा डाव; रणजीत नाईक-निंबाळकरांची झोप उडणार! | LetsUpp

राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उद्या सुनावणी सुरु होती. त्यामुळे अमोल कोल्हेंनी घेतलेली भेट महत्वाची मानल्या जात आहे. अजित पवार गटाकडून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नावे मात्र या याचिकेतून वगळली आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. अशातच अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने एकच चर्चा रंगली होती. अखेर ही राजकीय भेट नसल्याचं अमोल कोल्हेंनी सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube