तुषार दोषींच्या बदलीला स्थगिती? मंत्री दीपक केसरकरांनी केली मागणी

तुषार दोषींच्या बदलीला स्थगिती? मंत्री दीपक केसरकरांनी केली मागणी

Jalna Maratha Protest : जालन्यातील अंतरवली सराटीत घडलेल्या लाठीचार्जप्रकरणी पोलिस अधीक्षक तुषार दोषींना(Tushar Doshi) आधी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर दोषी यांची पुण्यात सीआयडीचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या बदलीवरुन मराठा आंदोलकांनी आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. या प्रकरणावरुन मंत्री दीपक केसरकरांनी(Deepak keserkar) तुषार दोषी यांच्या बदलीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मंत्री दीपक केसरकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.

भारतीय वायुसेनेत 317 जागांसाठी भऱती, 1 लाख 77 हजार रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?

दीपक केसरकरांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं, मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत दोषी यांची पुणे सीआयडी पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अंतरवली सराटी लाठीचार्जप्रकरणी दोषी यांची चौकशी सुरु असून चौकशी पूर्ण होईपर्यंत दोषी यांच्या बदलीच्या आदेशाच स्थगिती देण्याची मागणी दीपक केसरकरांनी पत्राद्वारे केली आहे.

‘लाल डायरीत’ सोनिया गांधींच्या कथित भावाचेही नाव! CM शिंदे येण्यापूर्वीच गुढांचा काँग्रेसवर बॉम्ब

जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलकांसोबत घडलेल्या घटनेनंतर आज जिल्ह्यात अत्यंत जलदगतीने घटना घडल्या. आंदोलकांनी दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. पोलीस अधीक्षक दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या जागी आयपीएस शैलेश बलकवडे यांची तत्काळ नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर तुषार दोषी यांनी पुण्याच्या सीआयडी पोलिस अधीक्षक पदी बदली करण्यात आली होती.

China : ‘कोरोना’ नाही ‘या’ आजाराने चीन हैराण! शाळा बंद, WHO ने मागितला अहवाल

मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे हे आंदोलनाला बसले होते. त्यावेळी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यात अनेक जण जखमी झाले होते. त्यामुळे दुषार दोषी हे अडचणीत सापडले होते. स्थानिक स्तरावर लाठीचार्ज झाल्याचा चौकशीत समोर आले होते.

दरम्यान, मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्या प्रकरणी तुषार दोषी यांच्यासह पोलिस प्रशासनावर संताप व्यक्त करण्यात आला होता. पोलिस अधीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी मराठा आंदोलकांनी केली होती. त्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर आणि बदली करण्यात आली होती. मात्र, मराठा आंदोलकांनी त्यांच्या बदलीवर आक्षेप घेत चौकशी पूर्ण होईपर्यंत बदलीला स्थगिती देण्याची मागणी केली होती.

सध्या तुषार दोषी पुणे सीआयडी पोलिस अधीक्षकपदी कार्यरत आहेत. मराठा आंदोलक आणि मंत्री दीपक केसरकरांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बदलीला स्थगिती देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube