‘लाल डायरीत’ सोनिया गांधींच्या कथित भावाचेही नाव! CM शिंदे येण्यापूर्वीच गुढांचा काँग्रेसवर बॉम्ब

‘लाल डायरीत’ सोनिया गांधींच्या कथित भावाचेही नाव! CM शिंदे येण्यापूर्वीच गुढांचा काँग्रेसवर बॉम्ब

जयपूर : येथील हॉटेल शिवविलासच्या मालकाच्या मुलाच्या समारंभात सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांचे भाऊही आले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी शशिकांत शर्माला यांना त्यांच्या भेटीची वेळ निश्चित करण्यास सांगितले होते, असा स्पष्ट उल्लेख ‘लाल डायरीत’ आहे, असा मोठा दावा माजी मंत्री राजेंद्र गुढा (Rajendra Gudha) यांनी केला. सोबतच सोनिया गांधींना दोन बहिणी आहेत, मग त्यांचा भाऊ म्हणून जयपूरला कोण आले होते? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

राजस्थानच्या राजकारणात लाल डायरीने मोठी खळबळ उडवून दिली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रचारात लाल डायरीचा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला होता. ऐन प्रचारात हा मुद्दा येत गेल्याने काँग्रेससाठी अडचणीचा विषय ठरताना दिसत होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा गुढा यांनी काँग्रेसच्या जखमेवरील खपली काढली आहे. (Rajendra Gudha has claimed that the name of Sonia Gandhi’s alleged brother is also in the ‘Lal Diary’)

पनवती शब्दावर आक्षेप, राहुल गांधी, खर्गेंविरोधात EC मध्ये तक्रार, खासदारकी धोक्यात येणार?

राजेंद्र गुढा यांनी विधानसभेत ही डायरी काढून यात मोठ्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत, असा दावा त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर त्यांना मंत्रिपदावरुन बडतर्फ करण्यात आले, सोबतच काँग्रेसमधूनही हकालपट्टी केली. त्यानंतर गुढा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. अशात त्यांनी आता प्रचार अंतिम टप्प्यात असताना या डायरीतील एका गोष्टीचा उल्लेख केला आहे.

2024 चा भाजपचा अजेंडा ठरला, राम मंदिराच्या पोस्टरवर मोदी झळकले

मुख्यमंत्री शिंदे आज राजस्थान दौऱ्यावर :

आज राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना आणि भाजप उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी एक दिवसीय जयपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात सर्वप्रथम त्यांचे जयपूर विमानतळावर जंगी स्वागत होणार आहे. यानंतर ते शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गुढा, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार स्वामी बालमुकुंद आचार्य, उपेन यादव यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या विजय संकल्प सभेत सहभागी होणार आहेत. त्यानंतर कोटपुतली येथील उमेदवार हंसराज पटेल गुर्जर यांच्या विजय संकल्प सभेत सहभागी होऊन मतदारांना संबोधित करणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube