तुषार दोशींच्या जागी आता शैलेश बलकवडे जालन्याचे नवे एसपी, तात्काळ स्वीकारला पदभार

  • Written By: Published:
तुषार दोशींच्या जागी आता शैलेश बलकवडे जालन्याचे नवे एसपी, तात्काळ स्वीकारला पदभार

Jalna Maratha Protest : जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात शुक्रवारी झालेल्या लाठीचार्जच्या घटनेमुळे पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेत अनेक आंदोलक आणि पोलीस जखमी झालेत. लाठीचार्जच्या घटनेनंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. सकल मराठी समाजाने विविध जिल्ह्यात सरकारविरोधात निदर्शने करतदोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने आज पोलीस अधीक्षक तुषार दोशींना (Tushar Doshi) सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. त्यांच्या जागी आता आपपीएस अधिकारी शैलेश बलकवडे (Shailesh Balakwade) यांना जालना जिल्ह्याचे एसपी म्हणून नियुक्त केलं.

जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलकांसोबत घडलेल्या घटनेनंतर आज जिल्ह्यात अत्यंत जलदगतीने घटना घडल्या आहेत. आंदोलकांनी दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. पोलीस अधीक्षक दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या जागी आयपीएस शैलेश बलकवडे यांची तत्काळ नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज दुपारीच तातडीने जालन्यात हजर होऊन पदभार स्वीकारला. याआधी पुण्यातील राज्य राखीव पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक म्हणून बलकवडे काम पाहत होते.

रोमांचक सामन्यात बांगलादेशने उभारला धावांचा डोंगर, नजमुल आणि मेहंदीने झळकावली शतके 

जालन्यातील मराठा आंदोलनामुळे संपूर्ण राज्यात वातावरण पेटलं आहे. त्यामुळे जालन्यात शांतता राखण्याचे मोठं आव्हान सरकारसमोर आहे. त्यामुळे पोलीस विभागाने तुषार दोशींच्या जागी शैलेश बलकवडे यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी फोनवरून चर्चा केली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्नावर आपण तोडगा काढू, शांततेच्या मार्गाने आंदोल करा, असं आवाहन फडणवीस यांनी मनोज जरांगे यांना केल्याची माहिती आहे.

दरम्यान, मराठा आंदोलकांची भेट घेण्यासाठी सरकारचं एक शिष्टमंडळ जालन्याच्या अंतरवली सराटीमध्ये दाखल झालं होतं. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आंदोलकांशी बोलणं करून दिलं. त्यामुळं मराठा आंदोलनाची पुढची दिशा काय असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बलकवडे कडक शिस्तीचे अधिकारी
शैलेश बलकवडे हे कडक शिस्तीचे आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. अहमदनगर जिल्ह्यात ते अप्पर पोलीस अधीक्षक होते. त्यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे तपास केले होते. त्यांनी गोंदिया, नागपूर ग्रामीण, कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. तसेच त्यांच्या पत्नी कादंबरी बलकवडे या देखील आयएएस अधिकारी आहेत

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube