मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रेड पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची भरती प्रक्रियेत अडचण, ‘SFI’ चं पर्याय सुचवत कुलगुरू अन् राज्यपालांना पत्र

एकूण गुण आणि दिलेली असते. परंतु, किती पैकी किती गुण मिळाले हे कुठेही नमूद केले नसल्याने भरती प्रक्रियेत अर्ज स्वीकारला जात नाही.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 12T215319.055

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीधर झालेले, तसंच सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. (Marathwada) उच्च न्यायालय, मुंबई आणि नागपूरसह औरंगाबाद खंडपीठांतर्फे विविध पदांसाठी प्रसिद्ध झालेल्,या भरती जाहिरातींमध्ये प्रत्येक सेमिस्टरमध्ये किती पैकी किती गुण व त्याची टक्केवारी नमूद करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र, विद्यापीठाच्या प्रत्येक सेमिस्टरच्या गुणपत्रिकेत SGPA/CGPA प्रमाणे ग्रेड आणि फक्त शेवटच्या सेमिस्टरमध्ये एकूण टक्केवारी दर्शवली जाते, त्यामुळे अर्ज करताना विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती सादर करणं अशक्य झालं आहे.

दरम्यान, यावर आता स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI)ने कुलगुरूंना एक पत्र दिलं आहे. त्यामध्ये, विद्यापीठाकडून मिळणाऱ्या गुणपत्रिकेत फक्त ग्रेड गुणांकन असतं, तर रूपांतरण प्रमाणपत्रामध्ये (Conversion Certificate) सर्व सेमिस्टर मिळून संपूर्ण पदवीचे एकूण गुण आणि Percentage दिलेली असते. परंतु, किती पैकी किती गुण मिळाले हे कुठेही नमूद केले नसल्याने भरती प्रक्रियेत अर्ज स्वीकारला जात नाही.

लोकशाही मूल्यांसाठी अन् उद्याच्या भविष्य असणाऱ्या पाल्ल्यांसाठी SFIची सभासद नोंदणी मोहिम जोरात

एमकेसीएल (MKCL) प्रणालीवर विद्यार्थ्यांच्या PRN क्रमांकाद्वारे प्रत्येक सेमिस्टरचे ‘किती पैकी किती गुण’ मिळाले ते उपलब्ध होतात. यासाठी प्राचार्याची सही-शिक्का असलेले एम.के.सी.एल.चे गुणपत्रक अधिकृतपणे वापरता येते या आशयाचे विद्यापीठाने जाहीर परिपत्रक काढावे व एम.के.सी.एल.च्या गुणपत्रकाच्या प्रतीवर सही शिक्का देण्याबाबत सर्व महाविद्यालयांना सूचना करावी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

एसएफआयने विद्यापीठाला खालीपैकी दिले पर्याय

1. अधिकृत गुणपत्रिकेत प्रत्येक सेमिस्टरनिहाय “किती पैकी किती गुण व टक्केवारी” समाविष्ट करून तात्काळ भरती प्रक्रियेपूर्वी उपलब्ध करून देणे.

2. रूपांतरण प्रमाणपत्र म्हणजेच कन्वर्जन सर्टिफिकेट मध्ये मूळ गुणपत्रकावरून सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रकामध्ये किती पैकी किती गुण मिळाले व टक्केवारी किती असे नमूद करून देण्यात यावे. (सदरील प्रमाणपत्रासाठी कमीत कमी शुल्क आकारावे.)

3.एमकेसीएलवरील गुणांच्या प्रती अधिकृतरित्या मान्य करत प्राचार्यांच्या सही-शिक्क्यानिशी प्रमाणित प्रत देण्यास परवानगी देणे व सर्व महाविद्यालयांना तशी सूचना करणे.

4. ग्रेड पद्धत प्रचलित असल्यामुळे “किती पैकी किती गुण देता येणार नाहीत” असे नमूद करणारे अधिकृत परिपत्रक काढणे.

5. अथवा विद्यापीठाने थेट मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्याशी पत्रव्यवहार करून ग्रेड पद्धतीनुसार अर्ज स्वीकारण्याची विनंती करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

सध्या खालील पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत अत्यंत निकट असल्याने विद्यार्थ्यांना तातडीची मदत आवश्यक आहे—

6) कनिष्ठ अनुवादक तथा दुभाषी – नागपूर खंडपीठ अंतिम तारीख 12 डिसेंबर 2025,

7) लिपीक, उच्च श्रेणी व निम्न श्रेणी लघुलेखक उच्च न्यायालय मुंबई तसेच खंडपीठ औरंगाबाद व नागपूर– अंतिम तारीख: ०५ जानेवारी २०२६

विद्यापीठाच्या सध्याच्या ग्रेड पद्धतीमुळे त्यांचे रोजगाराच्या संधींवर गंभीर परिणाम होत असून, “आमचे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा” अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली आहे. तसंच, या निवेदनाची प्रत राज्यपाल, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच परीक्षा व मूल्यमापन विभागाला पाठवण्यात आली आहे. या प्रसंगी एसएफआय जिल्हा सचिव अरुण मते, समाधान बारगळ, सुरज देवकर व विद्यार्थी उपस्थित होते.

follow us