विद्यार्थ्यांचा जीव गेल्यावर प्रशासन जागं होणार का?, वसतिगृहाचा काही भाग कोसळला, विद्यार्थी संतप्त

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मुलांचं छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृह कोसळ्याची घटना रात्री घडल्याचं समोर आलं आहे. गेली अनेक दिवसांपासून विद्यार्थी या वसतिगृहाची इमारत पाडून दुसरी बांधावी अशी मागण करत आहेत. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून याची कसलीही दखल घेतली जात नाही. (Marathwada) यातील गंभीर बाब म्हणजे या वसतिगृहाची मुदत संपलेलीही अनेक वर्ष होत आले आहेत. हे सगळं असतानाही प्रशासनाला जाग येताना दिसत नाही.
येथे सध्या मोजकेच मुलं राहतात. हा जो वसतिगृहाच्या आतील भाग कोसळला आहे तो एका विद्यार्थ्याच्या अगदी उशाला कोसळला आहे. तो विद्यार्थी झोपेत होता. सुदैवाने येथे मोठा अनर्थ टळला आहे. अन्यथा काही वाईट घटना घडली असती. येथील अनेक विद्यार्थी आता या घटनेवरून संताप व्यक्त करत असून या वसतिगृहाकडं प्रशासन कधी लक्ष देणार आहे असा प्रश्न करत आमच्यातील काही विद्यार्थी मेल्यावर प्रशासनाला जाग येईल का? असा थेट संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचे राज्यात पडसाद; मराठवाडा विद्यापीठात एसएफआयडून निदर्शने
या घटनेची लवकरात लवकर प्रशासनाने दखल घ्यावी आणि वसतिगृह नवीन बांधण्यात याव किंवा येथील विद्यार्थ्यांनी काही योग्य सोय करावी अशी मागणीही विद्यार्थ्यांनी यावेळी केली आहे. त्याचबरोबर, अनेक विद्यार्थी या विद्यापिठाचे विद्यार्थी असतानाही त्यांनी फक्त इतर महाविद्यालयातील पीएडी संशोधनाचे मार्गदर्शक असल्याने त्यांनी वसतिगृहात राहू दिलं जात नाही ही कसली न्याय पद्धत आहे असंही विद्यार्थी म्हणाले आहेत. त्यामुळे वसतिगृह विषयासंबंधी आता विद्यार्थी-विद्यार्थिनी आक्रमक झाले असून प्रशानाविरोधात मोठी भूमिक घेण्याच्या तयारीत विद्यार्थी असल्याचं चित्र विद्यापिठात आहे.
गेली अनेक दिवसांपासून विद्यापिठात सक्रिय असलेली एसएफआय ही संघटना विद्यार्थ्यांसाठी मोठे मोठे आंदोलन करत असते. परंतु, मागच्या काही काळात विद्यापिठ प्रशासनाने दबावाचं राजकारण सुरू केलं असल्याने विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनाही मोठ्या भीतीच्या वातावरणात वापरत आहेत. अनेकदा, आपल्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना विद्यार्थ्यांना, विद्यार्थी प्रतिनिधींना पोलिसांच्या माध्यमातून प्रशासन दबावात घेत आहे. थेट गुन्हेही अनेकदा दाखल होत आहेत त्यामुळे विद्यापिठात ही हुकुमशीही सुरू आहे का असंही विद्यार्थी आता विचारत आहेत. याच वसतिगृहात ही भींत पडल्याची घटना घडली तर तेथील रक्षकांनी आम्हाला फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मज्जावर केला ही सध्याची परिस्थिती आहे असंही विद्यार्थी म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात मुलांचं छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृह कोसळ्याची घटना रात्री घडल्याचं समोर आलं आहे. #DrBabasahebAmbedkarMarathwadaUniversity #Bamu #hostelcollapse pic.twitter.com/3nWSFB8uaE
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 1, 2025