Chhagan Bhujbal on Ajit Pawar for Maratha Reservation from OBC : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांमध्ये देखील मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून दोन गट पडले आहेत. त्यात सत्ताधाऱ्यांकडून दोन्ही समाजांना देखील नाराज न करता आरक्षण देण्यावर भर दिला जात आहे. मात्र यामध्ये ओबीसी समाजाकडून मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीतून मिळणाऱ्या आरक्षणाला विरोध केला जात आहे. त्यामध्ये सत्तेत असलेले छगन भुजबळ देखील सरकारच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यात आता अजित पवारांच्या आरक्षणाच्या भूमिकेवरून भुजबळांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
अजित पवारांच्या आरक्षणाच्या भूमिकेवरून भुजबळांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. मराठा एक समाज, एक जात आहे. तर ओबीसी हा एक वर्ग आहे. त्यामध्ये अनेक जाती आहेत. त्या सामाजिदृष्ट्या मागासलेले आहेत. आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्याला आमचा विरोध आहे.
आरक्षणाबाबत विचारले असता अजित पवार यांनी आरक्षणावरून प्रश्न विचारला असता. त्यावर ते म्हणाले होते की, राजकारण करताना मी कधीही जात-पात किंवा नात्याचा विचार करत नाही. मी फक्त माणून म्हणून पाहतो आणि मदत करतो. काही लोक जातीचे वेड डोक्यात घालण्याचा प्रयत्न करतात. समाजात तेढ निर्माण करतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींनासोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते. त्यामुळे कुणालाही त्यांच्या मागण्यांप्रमाणे आरक्षण मिळावे. यावर कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. यावर कुणी राजकारण करत असेल तर त्यांना आवर घाला. असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.