Download App

भुजबळांची नाराजी अन् शिंदेंचे उत्तर; सावरकर जयंतीचा वाद पेटला

Chhagan Bhujbal On Eknath Shinde :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काल स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंत होती. त्यानिमित्ताने दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये सावरकरांची जयंती साजरी करण्यात आली. पण यावेळी सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा हटविण्यात आल्याची टीका भुजबळांनी केली आहे.

सावरकर जयंतीला माझा विरोध नाही. मात्र, शिवराय यांची राजमुद्रा तिथे लावण्यात आली होती, ती झाकून सावरकरांचा पुतळा लावण्यात आल्याचं भुजबळांनी म्हटलं आहेत. पुढे ते म्हणाले की, तिथेच छोट्कया चौकात दोन पुतळे आहे. एक अहिल्याबाई होळकर यांचा अन् दुसरा सावित्रिबाई फुले यांचा. त्यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आले, मात्र पुतळे बाजूला करण्यात आले. दुसरीकडे हॉल असताना कार्यक्रम तिथेच का करण्यात आला. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे, असे भुजबळ म्हणाले आहे.

Video : ‘सिर्फ एक बंदा काफी है’ मनोज वाजपेयीची लढाई

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीदेखील ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर या आमच्यासाठी पूजनीय आणि आदरणीय आहे. त्यांचाविषयीचा आदर प्रत्येक देशवासियांच्या मनात भरलेला आहे, असे शिंदे म्हणाले.

राघव-परिणीती ‘या’ ठिकाणी अडकणार विवाह बंधनात; जोडपे वेंडिंग डेस्टिनेशल फायनल करण्यासाठी निघाले

तसेच  त्यांचा अनादर करण्याचे कोणतेही काम आमच्याकडून होणार नाही. मी स्वत: संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो आहे. ते स्वत: त्याचा खुलासा करणार आहेत. या प्रकरणी कोणीही गैरसमज करुन घेऊ नये. सावित्रीबाई फुले अन अहिल्याबाई होळकर या आमच्यासाठी आदरणीय आहे, असे शिंदे म्हणाले.

Tags

follow us