Chhagan Bhujbal On Phule Movie Release : अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ चित्रपट (Phule Movie) वादाच्या भोवऱ्यात आहे. प्रदर्शित होण्याआधीच राज्यातील ब्राह्मण महासंघाने या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतल्याचं समोर आलंय. यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांची (Chhagan Bhujbal) प्रतिक्रिया समोर आलीय. भुजबळांनी म्हटलंय की, सिनेमाला विरोध करण्यापेक्षा त्यावेळेसचा इतिहास समजून घेऊया. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे. सिनेमाला विरोध करू नका. लवकर हा चित्रपट प्रदर्शित होऊ द्या. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचे काम जगभरात जाऊ द्या, असं आवाहन त्यांनी केलंय.
धक्कादायक! वळण घेताना ताबा सुटला, हेलिकॉप्टर हवेतच उलटलं अन्.. पायलटसह 6 जणांंचा मृत्यू
यावेळी छगन भुजबळ यांनी ( Chhagan Bhujbal News) म्हटलंय की, आज ग्रंथाचे पुन्हा अनावरण करत आहोत. आज आनंदाची गोष्ट होत आहे. हा वाडा, ज्यात ही विहीर आहे. त्यावेळचे मागास दलीत ज्यांना आपण पाणी प्यायला देत नव्हतो, त्यावेळी फुलेंनी ही विहीर सगळ्यांसाठी खुली केली. त्यांच्यासोबत जेवले. सर्व महिलांना आधार दिला. सर्वांना सांभाळलं. ज्या महिला लग्नाची गरोदर राहायच्या, त्या महिलांना देखील आधार दिला.
त्यावेळी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी त्यावेळी पुण्यात पोस्टर्स लावली की, गरोदर असलेल्या महिलांनी आत्महत्या करू नका. आम्ही तुमचे आई-वडील आहोत. आमच्याकडे या बाळांतपण आम्ही करतो. आज सुद्धा हे शक्य नाही, त्यावेळी त्यांनी केलं. या वाड्याला मोठा इतिहास आहे. क्रांतीचं पाणी इथून पेटलं. जगातील पहिली क्रांती या वाड्यातून झाली. आपण हा इतिहास विसरत जात आहोत, हे दुर्दैव असल्याचं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलंय.
तहव्वूर राणा 18 दिवस NIA कोठडीत, पहिल्या रात्री काय घडलं? 10 पॉइंट्समध्ये जाणून घ्या..
केवळ ब्राह्मणच नाही तर आमच्यातल्या काही लोकांनी देखील फुलेंना विरोध केला, तर अनेक ब्राह्मणांनी फुलेंना मदत केली. अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे. इतिहास असल्याशिवाय तुम्ही भविष्य घडवू शकत नाहीत. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा लढा ब्राह्मणांच्या विरोधात नव्हता. अंधश्रद्धेच्या विरोधात होता, ब्राह्मणवादाच्या विरोधात होता.
फुलेंच्या चित्रपटाला काही लोक विरोध करत आहेत. चित्रपट बनवणारे लोक म्हणत आहेत की, जे सत्य आहे जे लिहिलं आहे. तेच आम्ही मांडलं. सगळ्यांना विनंती आहे. त्यावेळी परिस्थिती होती, तशी आज नाही. सगळं बदललं आहे. भिडे वाड्यासाठी अजित पवारांनी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. काम सुरू करा
म्हणून एकनाथ शिंदेंनी देखील 100 कोटी रुपये पाठवून दिले आहेत. पण काम सुरू नाही झालं, जागा कमी पडत आहे.
भिडे वाड्याच काम लवकर सुरू करा. मला आंदोलन करण्याची वेळ आणू देऊ नका. इतिहास स्मारकाचं देखील काम सुरू करा. लोक जागा द्यायला तयार आहेत, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय.