धक्कादायक! वळण घेताना ताबा सुटला, हेलिकॉप्टर हवेतच उलटलं अन्.. पायलटसह 6 जणांंचा मृत्यू

धक्कादायक! वळण घेताना ताबा सुटला, हेलिकॉप्टर हवेतच उलटलं अन्.. पायलटसह 6 जणांंचा मृत्यू

US Helicopter Crash : अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरुवारी येथील हडसन नदीत एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त (US Helicopter Crash) होऊन कोसळले. या हेलिकॉप्टरमधील सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक मीडियाने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने माहिती दिली की हा अपघात लोअर मॅनहॅटन आणि जर्सी शहरांदरम्यान घडला. न्यूयॉर्कचे महापौर एरिक एडम्स यांनी सांगितले की एक हेलिकॉप्टर हडसन नदीत क्रॅश झाले. या दुर्घटनेत तीन मुलांसह सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. मयतांमध्ये पायलट आणि स्पेनमधील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा समावेश आहे.

न्यूयॉर्क हेलिकॉप्टर्स टूर विमान दुपारी तीन वाजता रवाना झाले होते. नंतर काही वेळातच नियंत्रण हरवून बसले. त्यामुळे 3.15 वाजण्याच्या सुमारास हडसन नदीत कोसळले आणि बुडाले. न्यूयॉर्क पोलीस दलाने सोशल मीडियावर या अपघाताची माहिती शेअर केली. हडसन नदीत वेस्ट साइड हायवे आणि स्प्रिंग स्ट्रीटजवळ एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले.

Video : कझाकिस्तानमध्ये मोठा अपघात; 67 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले, अनेकांचा मृत्यू

या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बेल 206 प्रकारातील हेलिकॉप्टर नदीच्या पाण्यात बुडताना दिसत आहे. काही रेस्क्यू बोट्स हेलिकॉप्टरच्या आजूबाजूला फिरताना दिसत आहेत. ही दुर्घटना हॉलंड टनलच्या एका वेंटिलेशन टॉवरजवळ घडली. या ठिकाणी आपत्कालीन वाहन, फायर ट्रक आणि मदतकर्मी हजर होते. जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजजवळ वळण घेतल्यानंतर पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका व्हिडिओत हेलिकॉप्टर हवेतच उलटून नदीत पडताना दिसत आहे.

दरम्यान, न्यूयॉर्कमध्ये याआधीही असे अनेक अपघात झाले आहेत. 2009 मध्ये एक लहान विमान आणि एक हेलिकॉप्टर यांच्यात नदीवर धडक झाली. यात नऊ लोकांचा मृत्यू झाला होता. 2018 मध्ये ईस्ट रिव्हरमध्ये एक ओपन डोर चार्टर्ड हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube