Download App

Video : विधानसभेच्या जागा वाटपापूर्वीच भुजबळांनी शड्डू ठोकला; सांगून टाकला मतदारसंघ

छगन भुजबल नाशिक जिल्हा सोडून विधानसभा लढवणार आहेत अशी चर्चा असल्याबद्दल भुजबळांना विचारलं असता ते म्हणाले मी कुठेही जाणार नाही.

  • Written By: Last Updated:

Chhagan Bhujbal on Lasalgaon Assembly : छगन भुजबळ यांनी आगामी विधानसभेच्या अनुषंगाने अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांना आपण नाशिक मतदारसंघ सोडणार आहात अशी चर्चा आहे असा प्रश्न विचारला असता,  आपण दुसरीकडून कुठूनही निवडणूक लढवणार नसून नाशिक लासलगाव (Chhagan Bhujbal) येथून निवडणूक लढवणार आणि मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत असं उत्तर दिलं  आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून जी चर्चा सुरू होती त्या चर्चेला स्वत: भुजबळांनीच पूर्णविराम दिला आहे. त्याचबरोबर महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुणाचा चेहरा द्यायला पाहिजे असं विचारलं असता मला तरी कुणाचा दिसत नाही अशी टिप्पणी त्यांनी यावेळी केली. ते माध्यमांशी बोलत होते.

Narendra Patil :जरांगे पाटलांना डिवचलं तर आम्ही.. नरेंद्र पाटील भुजबळांवर संतापले

यावेळी भुजबळ यांनी रामगिरी महाराजांवरही भाष्य केलं. महंत रामगिरी महाराजांकडे मोठा भक्त परिवार आहे. पण, आपल्या प्रबोधनातून दुसऱ्या धर्माचा उल्लेख टाळला पाहिजे. कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी, अशी भावना त्यांनी माध्यमांसमोर बोलताना भुजबळांनी व्यक्त केली आहे.

सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी पंचाळे गावातील सप्ताहांतर्गत आयोजित प्रवचनात वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आंदोलन केलं जात आहे. छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर शहरांत शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले आणि महंत रामगिरी महाराज यांना अटक करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.

जरांगे CM होणार, पण सीएम झाल्यावर शिव्या देऊन चालत नाही, त्यामुळे वागणं सुधारा; भुजबळांचा खोचक टोला

संत ज्ञानेश्र्वर, संत तुकाराम या संतांनी ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना मांडली. ‘वैष्णवांचे जन, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ अशी अनेक उदाहरणे संतांनी दिली आहेत. त्यामुळे आपापल्या धर्माचा प्रचार-प्रसार केला पाहिजे. त्यामुळे महंत रामगिरी महाराज यांचे मोठे भक्तगण आहेत. मी स्वतःही त्यांच्या कार्यक्रमाला जातो. पण, आपल्या प्रबोधनातून दुसऱ्या धर्माचा उल्लेख टाळला पाहिजे. असं भुजबळ म्हणाले.

follow us