Download App

….म्हणून इथल्या नकली वाघांना पोटशूळ उठला, चित्रा वाघ यांची आदित्य ठाकरेंवर हल्लबोल

Chitra Wagh on Aditya Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे (Waghnakh) देशात येण्यापूर्वीच राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्याचे सांकृतिक कार्य मंत्री सुधीर मुंगटीवार (Sudhir Mungtiwar) इंग्लंडमधील वस्तूसंग्रहालयासोबत करार करण्यासाठी लंडन गेले आहेत. यावरुन आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आम्ही शिवरायांची वाघनखं इंग्लंडवरुन आणणार म्हणून इथल्या काही नकली वाघांना पोटशूळ उठला आहे, असे म्हणत त्यांनी ट्वीटरवर एक कविता शेअर केली आहे.

एकदा काही वाघांनी
ऐटीत मिशांवर मारला ताव
पण, बोलायला उघडलं तोंड
तेव्हा बाहेर पडलं म्याँव..

पट्टे होते रंगवलेले
अंगावर नव्हती फर
वाघाचं कातडं ओढून
सोंग आणलं मात्र जबर

डौल दाखवत खोटा
टाकली चार पावलं
चालून किती चालणार
काँग्रेसचं हे बाहुलं ?

मांजरंसुद्धा फिसकारली
शेजारी यांना पाहून…
ओळखा पाहू तुम्हीच
हे नकली वाघ कोण ?

वाघनखाचा वाद पेटला; शीतल म्हात्रेंकडून विरोधकांना ‘डुप्लिकेट वाघा’ची उपमा

आदित्य ठाकरेंनी काय म्हटले होते?
महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत की फक्त शिवकालीन आहेत? याबाबत राज्य सरकारने खुलासा करावा. तसेच ही वाघनखं किती वर्षांसाटी महाराष्ट्रात आणली जात आहेत. याबाबतही राज्य सरकारने माहिती जाहीर करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या मागणीवरुन शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धकालीन शस्त्र असलेली वाघनखे ब्रिटनच्या विक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियममधून भारतात परत आणण्यात येणार आहेत. याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार काल (1 ऑक्टोबर) लंडनला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचे तसेच सांस्कृतीक कार्य विभागाचे प्रधान सचिव, पूरातत्व विभागाचे संचालक आहेत.

Tags

follow us