Download App

‘नाक खाजवायलाही मॅडमची परवानगी लागते…’, मविआच्या नेत्यांवर CM शिंदेंचं टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

CM Eknath Shinde : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter session) उद्यापासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. यानंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीकास्त्र डागलं. सत्ताधारी नेत्यांनीही पत्रकार परिषदेत घेऊन आपली बाजू मांडली. विरोधकांनी बहिष्कार टाकल्यावरून सत्ताधारी नेत्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पुढच्या वेळी चहापाना ऐवजी पानसुपारी ठेऊ, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) सरकारवर टीका केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी विरोधकांवर टीका करताना नाक खाजवायलाही मॅडमची परवानगी लागते, असा टोला लगावला.

‘आता पोट वाढलं तर मी काय करु’; अजितदादांचा आव्हाडांना प्रतिसवाल 

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचंया दिल्लीवाऱ्या वाढल्यानं विरोधक सातत्यानं त्यांना कठपुतळी असल्याची टीका सहन करावी लागतेय. त्याचसंदर्भाने शिंदे म्हणाले की, आम्ही दिल्लीत गेल्यावर ते म्हणतात की यांनी आपला स्वाभिमान गमावला आहे, ते कटपुतळी आहेत. ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाकही खाजवता येत नाही, त्यांनी आमच्यावर आरोप करू नये, स्वाभीमानाची भाषा तर मुळीच करू नये. आम्ही दिल्लीला जातो, निधी आणतो. गेल्या अडीच वर्षांत अहंकारामुळेच राज्याचं नुकसान झाले. यांनी अहंकारामुळं अनेक प्रकल्प बंद पाडले. आमचे सरकार आल्यानंतर मेट्रो, आरे, समृद्धी असे सर्व प्रकल्प सुरू झाले. आमच्यावर टीका करणाऱ्यांनी विकासाच्या बाता करू नये, अशा शब्दात शिंदेंनी टीका केली.

Winter Session च्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित, पाहा फोटो… 

ते म्हणाले, मोदींचा करिष्मा संपला म्हणणाऱ्यांना जनतेनं दाखवून दिलं आहे. 3 राज्यात मोठे यश मिळाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, अशी ग्वाही जनतेने दिली आहे. विरोधकांनी बोलण्याआधी आपल्याकंड पाहावं, असंही शिंदे म्हणाले.

पुढं बोलतांना सीएम शिंदे म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपये दिले. त्यांना शेतकर्‍यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. कधीही घराबाहेर न पडलेले, शेतकऱ्यांच्या बांधावर जायच्या बाता करतात. आम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणार नाही, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही, अशी आमची भूमिका आहे. मागील सरकारच्या चुकीमुळे आरक्षण संपले. आम्ही कायमस्वरूपी आरक्षण देऊ.

Tags

follow us