Chief Minister Eknath Shinde Varasha Palace situation : महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, आज सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल देणार आहे. त्यामुळं सर्वाच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, सत्ता संघर्षाच्या निकालामुळं सर्वोच्च न्यायालयाकडे राज्याचं लक्ष लागलेच आहे. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानकडे देखील राज्याच्या नजरा लागलेल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा निवस्थानात आज सकाळपासून पोलीस बंदोबस्त नेहमीप्रमाणे अलर्टवर आहे. रात्री अनेक कायदेतज्ञ आणि अधिकरी यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे यांची चर्चा झाल्याची माहिती आहे. सकाळपासून मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानात आहे. सकाळपासून मीडियाच्या प्रतिनिधींनी वर्षा निवासस्थान बाहेर गर्दी केली आहे. सकाळपासून कोणीही बाहेरील व्यक्ती वर्षा निवासस्थानात दाखल झालेली नाही. अथवा कुणीही बाहेर गेलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी होईपर्यंत मुख्यमंत्री वर्षा निवस्थानात आसणार आहेत. याच ठिकाणी ते निकाल टीव्ही वर पाहतील अस बोलल्या जात आहे. सकाळपासून एकनाथ शिंदे हे कुटुंबासोबत आहेत. वैयक्तिक सहकारी सोडले तर निवस्थानात अजुन कोणीही अधिकारी नाही. सकाळी साडे दहा ते अकारा वाजता दरम्यान अधिकारी यायला सुरवात होईल अशी महिती सूत्रानी दिली आहे.
Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर काय होणार? जाणून घ्या शक्यता
संपूर्ण निकाल आल्यानतर काय भूमिका घ्यायची याची तयारी करण्यात आल्याचे समजते. निकाल आपल्या बाजूने लागला की मुख्यमंत्री तात्काळ पत्रकार परिषद बोलावणार आहेत. निकालानंतर विधानसभेकडे कौल जातो का? की मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल? याविषयी अनेक शक्यता बोलल्या जात आहेत. दरम्यान, जे काही होईल ते निकाल लागल्यानंतर होईल. निकालाच्या अनुरुप लोक आणि नेते भेटायला येतील. त्यानंतर वर्ष निवासस्थानी धावपळ उडेल. बाहेर राजकिय चर्चांचा वणवा पेटलेला असला तरी सद्या तरी वर्षा निवस्थानाच्याच्या आत शांतता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवल्यास पुन्हा महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलू शकतात.