Download App

2024 पर्यंत काळजी नको : एकनाथ शिंदेंचा आपल्या आमदारांना दिलासा

Maharashtra Politics : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून शिंदे गटातील आमदार अस्वस्थ होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराज आमदारांची बैठक घेतली. 2024 पर्यंत मुख्यमंत्री बदलणार नाही. तुम्ही निश्चित राहा, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदार आणि खासदार यांना दिले आहे. पण मंत्रिमंडळ विस्तार बाबत मौन पळाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाच्या सर्व आमदार-खासदार यांची महत्त्वपूर्ण बैठक वर्षा निवासस्थानी घेतली. राष्ट्रवादीच्या आमदारांचा सरकारमध्ये समावेश झाल्याने अनेक शिंदे गटाचे आमदार नाराज झाले होते. ज्यांच्यामुळे शिवसेना सोडवी लागली आज त्यांच्या सोबतच बसावे लागत आहे, असे नाराज आमदारांचे म्हणणे होते. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे अजून खातेवाटप झालेले नाही. उद्या अजित पवार अर्थमंत्री झाले तर निधी वाटप कसं होईल? आमच्या मंत्रिपदाचे काय? असे प्रश्न आमदारांकडून एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले.

आमदारांची पळवापळवी वाढली, उज्वल निकम म्हणाले, पक्षांतरबंदी कायदा कडक करा

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की जे घडत आहे त्याची चिंता करू नका. 2024 पर्यंत मुख्यमंत्री पदात कुठलाही बदल होणार नाही. असं आश्वासन शिंदे यांनी दिलं पण मंत्रिमंडळ विस्ताराचे काय? यावर भाष्य करायचे एकनाथ शिंदे यांनी टाळाले. त्यामुळे आज झालेल्या बैठकीतून शिंदे गटाच्या आमदारांचे कितपत समाधान झाले हा अनुत्तरीत प्रश्न आहे.

Tags

follow us