Chitra Wagh : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी सुप्रिया सुळेंना ( Supriya sule ) टोला लगावला आहे. ‘तुतारीतुनी थकाल वाजवुनी, भाजपद्वेषाची जुनी पिपाणी’ असं म्हणत वाघ यांनी एक कविता ट्विट करत सुळेंवर निशाणा साधला.
बॉक्स ऑफिसवर ‘Article 370’ आणि ‘क्रॅक: जीतेगा तो जीगा’मध्ये टक्कर, कोण ठरेल अव्वल?
या ट्विटमध्ये चित्रा वाघ म्हणाल्या की, ओ मोठ्ठ्या ताई….
तुतारीतुनी थकाल वाजवुनी
भाजपद्वेषाची जुनी पिपाणी…
करा कितीही खोटे पेरणी
परि जनतेच्या ना पडेल पचनी..
उंटावरली उगा अनेक शहाणी
पोकळ बडविती नगारखानी..
लवकरच तुम्हा पाजू पाणी
सज्ज आम्ही आहो युद्धरणीं…
ओ मोठ्ठ्या ताई….@Supriya_sule
तुतारीतुनी थकाल वाजवुनी
भाजपद्वेषाची जुनी पिपाणी…करा कितीही खोटे पेरणी
परि जनतेच्या ना पडेल पचनी..उंटावरली उगा अनेक शहाणी
पोकळ बडविती नगारखानी..लवकरच तुम्हा पाजू पाणी
सज्ज आम्ही आहो युद्धरणीं…@Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish…— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 23, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commission) अजित पवारांना बहाल केलं. राजकारणात असे एकामागोमाग एक धक्के बसत असताना काल एक मोठी घटना घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Sharad Pawar) पक्षचिन्ह दिलं. आयोगान ‘तुतारी’ हे चिन्ह पक्षाला दिलं. पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून या आदेशाची माहिती देण्यात आली. आगामी निवडणुकात हे नवे पक्षचिन्ह घेऊन शरद पवारांचा पक्ष लोकांत जाणार आहे.
“तू तुझ्या पक्षाचं बघ नाहीतर सुपडा साफ होईल”; एकेरीवर येत जरांगेंचा वडेट्टीवारांवर घणाघात
याआधी राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाला मिळालं. त्यामुळे शरद पवार यांनी पक्षांसाठी वेगळं नाव आणि चिन्ह आयोगाला सुचवलं होतं. तीन चिन्ह सुचवण्यात आली होती. पक्षाचं नाव आगामी राज्यसभा निवडणुकीपुरतं होतं त्यामुळे पक्षाला चिन्ह देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे शरद पवार गटाने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले होते.
न्यायालयात सुनावणी झाली. पक्षचिन्हासाठी निवडणूक आयोगात अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आठवडाभरात आयोगाने चिन्ह द्यावे असे आदेश देण्यात आले. यानंतर शरद पवार गटाने तीन पर्याय सुचवले होते. परंतु, आयोगाने तिन्ही पर्याय नाकारत तुतारी हे चिन्ह शरद पवार यांच्या पक्षाला दिले. आता सुप्रीम कोर्टाकडून पुढील आदेश येईपर्यंत हेच पक्षचिन्ह शरद पवार गटाकडे राहिल.