Chitra wagh : उपुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून (Shivsena) ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याची चर्चा सुरू असतांनाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पुत्र तथा आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यादरम्यान त्यांनी काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली. तसेच ते आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनाही भेटण्याची शक्यता आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
स्वप्नीलच्या सुपरहिट मितवाची दशकपूर्ती! पाहा आठवणींना उजाळा देणारे फोटो
आम्ही दिल्लीत कुणापुढे झुकत नाही म्हणणारे आदित्य ठाकरे थेट दिल्लीत जाऊन राहुल गांधींची हुजरेगिरी करत आहेत, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
चित्रा वाघ यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, ज्यांच्या आजोबांना नेते ‘मातोश्री’वर भेटायला यायचे, त्यांचा नातू मात्र दिल्लीत जाऊन चरणस्पर्श करतोय..! मराठी अस्मितेचा हा अपमान नाही का..? संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेऊन मोठमोठ्या गर्जना करतात, पण आदित्य ठाकरेंच्या दिल्लीतल्या हुजरेगिरीवर गप्प का? की यावरही काहीतरी चमत्कारिक स्पष्टीकरण येणार का, असं त्या म्हणाल्या.
आरोग्य निधीच्या 16 लाख रूपयांचा अपहार; गैरव्यवहार प्रकरणी डॉ. बोरगे, रणदिवे यांना अटक
चित्रा वाघ यांनी पुढं लिहिलं की,आम्ही दिल्लीत कुणापुढे झुकत नाही म्हणणारे आदित्य ठाकरे थेट दिल्लीत जाऊन राहुल गांधींची हुजरेगिरी करत आहेत! महाराष्ट्रात स्वाभिमानाच्या गप्पा आणि दिल्लीत चरणस्पर्श–हीच का ठाकरे गटाची नवी परंपरा..?, असा सवाल करत आजोबांचं तरी स्मरण ठेवा रे, असा उपरोधिक सल्लाही वाघ यांनी दिला.
दरम्यान, चित्रा वाघ यांच्या टीकेला आता आदित्य ठाकरे काय प्रत्युत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.
आदित्य ठाकरेंचा पवारांवर हल्लाबोल
दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केल्याच्या मुद्द्यावर भाष्य करत उघड नाराजी व्यक्त केली. कोणी कोणाचे कौतुक करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही देखील सत्ताधारी पक्षातील नेत्यांना भेटतो. मात्र, प्रत्येक वेळी त्यामागील कारण स्पष्टपणे सांगत असतो. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडण्याचे पाप एकनाथ शिंदे यांनी केले. त्यांनी दिलेलं नाव, चिन्ह चोरल्याचं पाप केलंय. ज्यांनी महाराष्ट्र लुटला किंवा ज्यांनी कुटुंब फोडले त्यांचे कौतुक आमच्या हातून कधीही झाले नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.