Download App

…तर हीच खरी आमची संपत्ती; शिंदे गटाचे स्पष्टीकरण

Shiv Sena party funds: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हा एकनाथ शिंदे यांच्या गटाला गेल्यानंतर आता शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) आणि पक्षाचा निधी (party funds) देखील शिंदे गटाला देण्यात यावे यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर शिंदे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.’स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हीच आमची खरी संपत्ती असून ती आम्हाला पुरेशी आहे, असे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.

शिवसेना कुणाची या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्ष असून त्यांनाच पक्षाचे नाव आणि चिन्ह या दोन्ही अधिकृत आणि नोंदणीकृत गोष्टी देण्यात आल्या होत्या. तोच धागा पकडून आता अॅडव्होकेट आशिष गिरी यांच्याकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

यावर शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी म्हटले की शिवसेनेच्या चल आणि अचल मालमत्तेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेशी आमचा काहीही संबंध नाही, स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हीच आमची खरी संपत्ती असून ती आम्हाला पुरेशी आहे, अशी माहिती शिवसेना समन्वयक नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ‘अवकाळी’च्या नुकसान भरपाईसाठी 177 कोटी

शिवसेना पक्षाचा निधी कुठेही जाऊ नये, अशी माझीही इच्छा आहे. त्यासाठई न्यायालयाने आवश्यक ती कारवाई करुन ही मालमत्ता ताब्यात घ्यावी. हा निधी इतर कुणाच्याही हातात जाऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत केवळ पक्षनिधीचं नव्हे तर शिवसेना भवन आणि शिवसेनेच्या शाखांच्या वापरावरही रोक लावण्यात यावी, असे याचिकाकर्ते आशिष गिरी यांनी म्हटले आहे.

Tags

follow us