Download App

‘गंगा भागीरथी’ उल्लेखावरुन राष्ट्रवादीत विसंवाद, सुप्रिया सुळे-रुपाली चाकणकर आमने समाने

  • Written By: Last Updated:

Supriya Sule on Widhwa women : विधवा महिलांच्या नावापुढे ‘गंगा भागीरथी’ (Ganga Bhagirathi) असा उल्लेख करण्यावरुन राज्यातील राजकारण आणि समाजकारण ढवळून निघाले आहे. याच मुद्द्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) विसंवाद असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हा निर्णय वेदनादायी असल्याचे म्हटले आहे तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे.

रुपाली चाकणकर यांनी या निर्णयाचे स्वागत करताना केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की ‘महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्याकरिता विधवा ऐवजी ‘गंगा भागिरथी’ हा शब्द वापरण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्याबद्दल त्यांचे मनपुर्वक आभार’

‘गंगा भागीरथी’वरुन भाजपमध्ये मतभेद, चित्रा वाघ यांनी सुचविला दुसरा शब्द

आयोगाच्या या शिफारसीचा संवेदनशीलतेने विचार करत महिलांना सन्मान मिळवून देणारा सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल शेकडो महिलांनी हात उंचावत याला पाठिंबा दिला होता. मंत्री महोदयांचे अभिनंदन… पुरोगामी महाराष्ट्राचा हा निर्णय महिलांचे सबलीकरण, सक्षमीकरण यात मोलाचा ठरेल अशी आशा आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

Letsupp Special : Ajit Pawar यांच्यासोबत किती आमदार? हा आहे आकडा!

दुसरकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. गंगा भागीरथी असा शब्दप्रयोग करण्याचा राज्य सरकार विचार करत असून हे अतिशय वेदनादायी आहे, असे सांगत तो निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांना त्यांनी पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले की महिलांच्या बाबतीतील हा अतिशय संवेदनशील विषय हाताळत असताना व त्यासंबंधी मोठा निर्णय घेत असताना त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था व संघटनांना विश्वासात घेऊन व त्यांच्यासोबत विचार विनिमय करुन आपण निर्णय घेतला पाहिजे.

Pankaja Munde | राजकारणाचे व्यासपीठ धर्माच्या लोकांनी व्यापलं... | LetsUpp Marathi

Tags

follow us