कॉंग्रेस पक्ष बुडतं जहाज, बुडत्या बोटीत कोण पाय ठेवणार नाही; विलिनीकरणावरुन CM फडणवीसांची टीका…

कॉंग्रेस पक्ष बुडतं जहाज, बुडत्या बोटीत कोण पाय ठेवणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार गटाच्या विलिनीकरणावरुन केलीयं.

Untitle (6)

Untitle (6)

Cm Devendra Fadanvis : कॉंग्रेस पक्ष बुडतं जहाज आहे, बुडत्या बोटीत कोण पाय ठेवणार नाही. काँग्रेसमधून बाहेर पडलेले पक्ष परत जाणार नाहीत, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra Fadanvis) यांनी केलीयं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कॉंग्रेसमध्ये विलिनीकरणाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार शरद पवार यांच्यावरही सडकून टीका केलीयं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

महिलांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरून कारवाई; प्रणित मोरे, हिमांशू जांगरा आणि डॉ. सेजल पवार यांना चौकशीचे समन्स

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कॉंग्रेस पक्ष बुडतं जहाज…बुडत्या बोटीत कोण पाय ठेवणार नाही. काँग्रेसमधून बाहेर पडलेले पक्ष परत जाणार नाही. विरोधी पक्ष एकत्र आले की भाजपला अतिरिक्त जागा मिळेल. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास आम्हाला फायदा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचे 12 वर्ष पूर्ण करत त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांचा विक्रम मोडीत काढला आहे.सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम मोडला. भ्रष्टाचाराचा एकही डाग नरेंद्र मोदींवर लावता आला नाही. 12 वर्षे बेदाग सरकार मोदींनी चालवून दाखवलं. पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रात अनेक बदल झाले असल्याचंही फडणवीस म्हणाले आहेत.

मागण्या त्याच रूप नवं! हुंडा हा शब्द बंद झाला, पण प्रथा परंपरांच्या नावाखालच्या लग्नातील देवाण-घेवाणीचं काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सध्या जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करुन दाखवलीयं. चालू वर्षातला अर्थिक विकास दर 7 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मोदी सरकारने 51 लाख कोटी रुपये विविध योजनेतून दिले आहेत. जगात सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था भारताचीच आहे. मागील 12 वर्षांत सुशासन आणि सुप्रशासन निर्माण झाले आहे. भारत फाईव्ह ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असून 94 टक्के कर्ज एका दिवसांत फेडण्याची भारताची क्षमता आहे. मोदींच्या काळात 6 कोटी लोकं डिजिटल साक्षर झाले आहेत. देशांतील 26 शहरांत मेट्रोचं नेटवर्क उभारलंय.

ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का! तृणमूल पक्षात फूट पाडलेल्या 19 खासदारांची यादी जाहीर

पंतप्रधान मोदींनी 51 लाख कोटी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात दिले असून मोदींनी 13 नवी एम्स हॉस्पिटल्स उभारले आहेत. दिवसाला 34 किमीचे राष्ट्रीय महामार्ग रोज बनत आहेत. 100 टक्के रेल्वे ब्रॉडगेज होऊन इलेक्ट्रीकही झाली. 164 हुन अधिक वंदे भारत रेल्वेगाड्या सुरु झाल्या आहेत. तसेच जगातले 30 देश भारताची युपीआय यंत्रणा वापरत असून मोदींनी अस्मिता पुन्हा जागी केलीय असल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय.

Exit mobile version