Download App

“आमच्याकडे मान अपमान मनात होतो अन्..”, CM फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ

आमच्याकडे मान अपमान होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

Devendra Fadnavis : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर नाराजीची लाट उसळली आहे. काही आमदारांनी दबक्या आवाजात तर काही जणांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये छगन भुजबळ आघाडीवर आहेत. काल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. फडणवीसांनी आठ ते दहा दिवसांत योग्य मार्ग काढू असं आश्वासन त्यांना दिलं आहे. या घडामोडी घडत असतानाच आता देवेंद्र फडणवीसांचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे. आमच्याकडे मान अपमान होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं असं वक्तव्य त्यांनी केलं. निमित्त होतं संगीत मानापमान चित्रपट ट्रेलर लाँचिंगचं.

संगीत मानपमान हे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाटक. याच नाटकावर प्रेरित संगीत मानापमान या चित्रपटाचा ट्रेलर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी फडणवीसांनी राजकीय फटकेबाजी करत हास्याचे कारंजे उडवले.

PM Kisan योजनेचा निधी वाढणार? 12 ऐवजी 15 हजार मिळणार, CM देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले?

फडणवीस पुढे म्हणाले, मी गेल्या दोन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेवाटप, बंगले वाटप करून संगीत मानापमानला आलोय. आमच्याकडे मान अपमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं असे फडणवीसांनी म्हणताच उपस्थितांत हशा पिकला. या क्षणाचा मी साक्षी होतोय याचा मला आनंद आहे. सुबोध भावेंनी बालगंधर्व साकारला. भामिनीही साकारल आता धैर्यधर होणार आहेत. आम्हाला मुख्यमंत्री व्हावं लागतं मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं पण पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं.

संगीत नाटकांची परंपरा मराठी भाषेला लाभली आहे. आता आपली मराठी भाषा अभिजात भाषा झाली आहे. आपलं नाट्यसंगीतही तितकचं अभिजात आहे. या परंपरा नव्या स्वरुपात नव्या पिढीसमोर येणं गरजेचं आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलं. संगीत मानपमन हा चित्रपट प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन पहावा. चित्रपटाचा ट्रेलर सुंदरच आहे चित्रपट देखील सुंदरच असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

follow us