PM Kisan योजनेचा निधी वाढणार? 12 ऐवजी 15 हजार मिळणार, CM देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले?

PM Kisan योजनेचा निधी वाढणार? 12 ऐवजी 15 हजार मिळणार, CM देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले?

CM Devendra Fadnavis On PM Kisan Yojana : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पीएम किसान योजनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. या योजनेच्या (PM Kisan Yojana) माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना एकूण 12 हजार रूपयांचा निधी देते. हा निधी आला 15 हजार रूपये करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज पुण्यात शेतकरी सन्मान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

मोठ्या मताधिक्यामुळे जबाबदारी वाढली, सर्वांच्या सहकार्याने पार पाडणार ; आमदार आशुतोष काळे

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत आहेत. शेतकरी बांधवांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेतंर्गत सरकारकडून वर्षाला सहा हजार रूपयांचा निधी दिला जातो. तर राज्य सरकार नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रूपये देते. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बारा हजार रूपये मिळतात, तर हीच मदत पंधरा हजार रूपये करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, शाश्वत शेतीसाठी पारंपारिक शेती अन् आधुनिक विज्ञानाची सांगड घालणं आवश्यक आहे. रसायनांचा वापर टाळून नैसर्गिक शेतीचा अवलंब केला पाहिजे. याच पार्श्वभूमीवर पुढील 3 वर्षांमध्ये 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणण्यासाठी राज्य सरकार नैसर्गिक शेती मोहिम देखील राबवणार आहे. तसंच छोट्या शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण परवडावं म्हणून गट शेती तसंच अवजारांची बॅंक, शेततळे अशा अनेक योजना राबविण्यात येत असल्याचं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलंय.

तुम्ही फडणवीसांच्या टीमचे कॅप्टन, असं म्हणताच उदयनराजे म्हणाले ‘नाही रे बाबा…’अन् पिकला एकच हशा

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास ग्रामीण प्लस योजनेतंर्गत देशातील तसेच राज्यातील प्रत्येक गरीब शेतकरी कुटुंबाला पक्कं घर उपलब्ध करून दिले जाईल, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलंय. ते किसान सन्मान दिवसानिमित्ताने शेतकरी तसेच ग्रामीण विकास लाभार्थी संमेलनामध्ये बोलत होते. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्यासाठी आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी विविध योजना सुरू केल्या असल्याचं देखील प्रतिपादन शिवराज सिंह यांनी केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube