Download App

शिवजन्मोत्सवानिमित्त ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव 2025’चं आयोजन, CM फडणवीस करणार उद्घाटन

  • Written By: Last Updated:

CM Devendra Fadnavis will inaugurate Hindavi Swarajya Mahotsav 2025 : शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य महोत्सव 2025 चं (Hindavi Swarajya Mahotsav 2025) आयोजन करण्यात आलंय. त्याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली आहे. छत्रपती शिवरायांच्या 399 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालय आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय.

शिवनेरी किल्ल्यावर शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालय मैदानाच्या प्रांगणात 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव 2025’ चं आयोजन करण्यात आलंय. 17 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता या सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राची संस्कृती, कला, लोककला, सभ्यता आणि परंपरा दाखवणाऱ्या विविध कार्यक्रमांचा समावेश असलेल्या ‘शिवजन्मोत्सवाचे’ आयोजन करण्यात आलंय.

बायको कुंभमेळ्याला गेली…नवरा संतापला, घटस्फोटासाठी थेट न्यायालयात पोहोचला

या महोत्सवासाठी (Shiv Jayanti) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार , सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, इंद्रनील नाईक, राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, पुणे जिल्ह्यातील सर्व विधानपरिषद विधानसमा सदस्य हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवातंर्गत 17 फेब्रुवारी सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत राज्यातील महिला बचतगटांच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी विविध बचतगटांची उत्पादने आणि खाद्य पदार्थाच्या स्टॉलचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत महाराष्ट्राच्या जिद्दीचे प्रतीक असलेली शिवनेर महोत्सव बैलगाडा शर्यत घेण्यात येणार आहेत. मराठी मातीतील भव्य कबड्डी स्पर्धा सकाळी 11 वाजता असणार आहे. रात्री 8 वाजता शिवस्पर्श शिवसह्याद्री सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठानच्या वतीने (शिवसह्याद्री ऐतिहासिक महानाट्याचा) प्रयोग सादर करण्यात येणार आहे.

‘बदनाम करण्याचं षडयंत्र… त्याचं नाव मी मुख्यमंत्र्यांना सांगणार’; सुरेश धसांनी दिला इशारा

18 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत विविध बचतगटांची उत्पादने व खाद्य पदार्थाच्या स्टॉलचे प्रदर्शन असणार आहे. तर स्वरांजली कलामंच, पुणे निर्मित(गौरव माझ्या महाराष्ट्राचा) हा सांस्कृतिक कार्यक्रम रात्री 8 वाजता सादर करण्यात येणार आहे. तसेच शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर रात्री 12 वाजता छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात येणार आहे. 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत जुन्नर तालुक्यातील गुणवंत कलाकार शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके सादर करतील. सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवरायांची महाआरती आणि सायंकाळी 6 वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वाजता सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत यांचा संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे.

17 ते 19 फेब्रुवारी 2025 दरम्यान हा शिवजन्मोत्सव जुन्नर येथील शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालय मैदानाच्या प्रांगणात पार पडणार आहे. महाराष्ट्रातील तमाम नागरिक आणि शिवप्रेमींनी या महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहावे, असं आवाहन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पर्यटन संचालक डॉ.बी.एन. पाटील यांनी केलंय.

 

follow us