‘बदनाम करण्याचं षडयंत्र… त्याचं नाव मी मुख्यमंत्र्यांना सांगणार’; सुरेश धसांनी दिला इशारा

‘बदनाम करण्याचं षडयंत्र… त्याचं नाव मी मुख्यमंत्र्यांना सांगणार’; सुरेश धसांनी दिला इशारा

Suresh Dhas On Dhananjay Munde Meeting Controversy : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे आमदार सुरेश धस हे अख्ख्या महाराष्ट्राला कळले होते. तेच सुरेश धस आता कालपासून पुन्हा एकदा चर्चेत आहेत. आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि मंत्री धनंजय मुंडे यांची (Dhananjay Munde) गुप्त भेट झाल्याचं काल उघडकीस आलं. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यात. यावर आता सुरेश धस यांची प्रतिक्रिया समोर आलीय.

महिलांशी गैरवर्तन केल्यास एसपींना टायरखाली घ्यायला सांगेन; अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी

यावर सुरेश धस म्हणाले की, मी अगोदरच जाहीर केलं होतं, पंकजा मुंडे यांची मी भेट घेणार नाही. त्यांनी माझ्याविरोधात काम केलंय, त्यांचा सत्कार करणार नाही. मी आमच्या प्रदेशाध्यक्षांकडे जेवायला गेलो होते, तिथे गेल्यावर कळालं की, त्यांनी मुंडेंना देखील बोलवलेलं आहे. तिथे अर्धा-पाऊण तास आम्ही बोललो. बावनकुळे साहेबांनी सगळंच खुलं केलंय. गुपचूप भेट नव्हती. त्यांच्या बंगल्याबाहेर पन्नास-शंभर लोकं होते. त्यासंदर्भात अंजली दमानिया ताईंनी स्टेटमेंट पण केलं होतं. पण त्या बैठकीत मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो, त्यामुळे मी काही त्या भेटीबाबत स्टेटमेंट दिलं नाही, असं धस म्हणाले आहेत.

अंजली ताई काय बोलतात? याला मी महत्व देणार नाही. मला भावना आहेत म्हणून मी आवाज उठवलेला आहे. संजय राऊत आंतरराष्ट्रिय वक्ते आहेत, त्यांच्याबाबतीत मी काही बोलणार नाही. असं धस म्हणाले आहेत. मनोजदादा आमचं दैवत आहेत, ते दोन दिवसांत क्लिअर होईल. ते तडीतपाडीने बोलले आहेत. 73 कोटींच्या घोटाळ्याचं पत्र अजितदादांना दिलंय. एक-दोन दिवसांत कळेल. प्रत्येक बारीक गोष्टीवर मी लक्ष ठेवून आहेत, मी फक्त टीव्हीवर बोलत नाही असं देखील सुरेश धस म्हणाले आहेत.

17 बॅट, 27 बॅग आणि अडीच क्विंटल सामान…’त्या’ स्टार क्रिकेटरसाठी BCCI ने मोजले लाखो रुपये

हत्या प्रकरणी प्रत्येक वेळी सुरेश धसचं पत्र आहे. महादेव मुंडेंच्या चौकशीला सुद्धा सुरेश धस यांचं पत्र आहे. सुरेश धस सगळं व्यवस्थित काम करतो. ज्याला काम करायचं असतं, त्याने वारंवार बोलायचं नसतं. काम करत राहायचं असतं. त्यामुळे काही जणांना जलसी झालेली आहे. बदनाम करण्याचं षडयंत्र रचण्याचं काम काही लोक करीत आहेत. षडयंत्र रचून हा कसा बदनाम होईल, संतोष देशमुखवरून यांचा फोकस कसा हटेल? असा काहीजणांचा प्रयत्न आहे.

मला बदनाम करणाऱ्यांचं नाव मी आधी मुख्यमंत्र्‍यांना सांगेन. आम्हाला पण कळतं, मुख्यमंत्र्‍यांचा कानावर घालणार. त्यांचा पर्दाफाश लवकरच करणार, असा इशारा आमदार सुरेश धस यांनी दिलाय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube