Download App

उद्धव ठाकरेंना 2004 पासूनच मुख्यमंत्री व्हायचं होतं; मुख्यमंत्री शिंदेंनी पुन्हा डिवचलं

उद्धव ठाकरे यांना 2004 पासूनच मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यासाठी ठाकरेंनी शरद पवारांकडे दोन माणंस पाठवली असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचलं आहे. दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही गटाचा दसरा मेळावा आज पार पडला. शिंदे गटाचा आझाद मैदानात तर ठाकरे गटाचा शिवतीर्थावर मेळावा झाला. मेळाव्यादरम्यान दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर सडकून टीका केली.

‘आम्हीच आग आम्हीच भिंत, छाटू तुमचे पंख’; शेरोशायरी करीत दानवेंनी शिंदे गटाला ललकारलं

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना 2004 पासूनच मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यासाठी ठाकरेंनी शरद पवारांकडे दोन माणंस पाठवली होती. उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस करा, अशी विनंती करण्यात आली होती. रामदास कदमांसह सर्वच नेत्यांना याबाबत माहिती असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तसेच उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा जुगाड लागत नव्हता. त्यानंतर जशा विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागला, त्यानंतर लगेचच म्हणाले की, आम्हाला सगळे दरवाजे मोकळे आहेत. तेव्हा तुम्ही युतीमध्ये लढले नंतर कसे काय दरवाजे शोधायला लागले? असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

युवा संघर्ष यात्रेकडे दुर्लक्ष केल्यास जबरदस्त किंमत मोजावी लागेल : पवारांचा शिंदे सरकारला इशारा

मेळावा शिवतीर्थावर करु शकलो पण..,
जिथे बाळासाहेबांचे विचार तिथेचं आमचं शिवतीर्थ आहे. मी दसरा मेळावा शिवतीर्थावर करु शकलो पण राज्यात सुखशांती लाभावी म्हणून नाही केला. जिथे बाळासाहेबांचे विचार खुलेआमपणे मांडता येतात तेच आपलं शिवतीर्थ असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

तसेच बाळासाहेब ज्यांना गाडायची भाषा करायचे त्यांना तुम्ही डोक्यावर गेऊन नाचत आहात. बाळासाहेबांनी ज्यांना, ज्यांना नाकारलं त्यांचे तळवे चाटायचं काम तुम्ही करीत आहात. बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढणाऱ्यांनाच आज तुम्ही डोक्यावर घेत आहात, हे कटू सत्य असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Pune Metro : स्वप्न पूर्ण होणार! मेट्रो ट्रेन पिंपरीपासून आता थेट निगडीपर्यंत, केंद्राची मंजुरी

आम्ही सत्तेवर लाथ मारली, सत्तेची खुर्ची सोडली पण बाळासाहेबांचा विचार सोडला नाही. कुठे बाळासाहेबांचा विचार आणि कुठे सत्तेसाठी लाचारी हे दुर्देव आहे. जिथे बाळासाहेबांचे विचार तिथेचं आमचं शिवतीर्थ आहे. मी दसरा मेळावा शिवतीर्थावर करु शकलो पण राज्यात सुखशांती लाभावी म्हणून नाही केला. जिथे बाळासाहेबांचे विचार खुलेआमपणे मांडता येतात तेच आपलं शिवतीर्थ असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

ज्या काँग्रसेच बाळासाहेबांनी वाभाडे काढले आज त्यांचेच गोडवे गायले जात आहेत. मनिशंकर अय्यरला बाळासाहेबांनी जोडे मारले. आज त्याचं काँग्रेसचे जोडे हे लोकं उचलतात. ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी म्हटलं होतं, माझी जेव्हा काँग्रेस होईल तेव्हा माझ दुकान बंद करेन हे बाळासाहेबांचे शब्द होते, असंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us