Download App

निवडणुकीमुळे विरोधकांच्या बुडाखाली फटाके फुटताहेत; CM शिंदेंची फटकेबाजी…

विधानसभा निवडणुकीमुळे विरोधकांच्या बुडाखाली फटाके फुटताहेत, निकालाच्या दिवशी महायुतीच्याच आयटम बॉम्बचा धमाका होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलायं.

Cm Eknath Shinde News : विधानसभा निवडणुकीमुळे विरोधकांच्या बुडाखाली फटाके फुटताहेत, निकालाच्या दिवशी महायुतीच्याच आयटम बॉम्बचा धमाका होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी व्यक्त केलायं. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच जळगावमध्ये शिंदे गटाची जाहीर सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते.

वंचितची 5वी यादी जाहीर! श्रीगोंद्यात मोठा मोहरा मिळाला; अण्णासाहेब शेलारांना उमेदवारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विधानसभा निवडणूक जवळ आल्याने विरोधकांच्या बुडाखाली फटाके फुटत आहेत. विधानसभा निकालाच्या दिवशी महायुतीच्याच विजयाचा धमाका होणार असून तो आयटम बॉम्ब असणार आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. तसेच मी जेव्हा मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत चर्चा करत होतो, योजनेची घोषणा केली तेव्हा विरोधकांना वाटत होतं की हा चुनावी जुमला आहे पैसे काही येणार नाहीत, असं सांगण्यात येत होतं. ही योजना कागदावर राहील मग महायुतीला आपण बदनाम करु असं विरोधकांना वाटत होतं, पण एकनाथ शिंदे शब्द पाळणारा आहे. “एक बार कमिटमेंट दिया तो खुद की भी नही सुनता” अशी डायलॉगबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी केलीयं.

माझ्या बापाविषयी बोलाल तर..,; थोरातांची वाघीण सुजय विखेंच्याही पुढचं बोलली

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची एका महिन्यात आम्ही अंमलबजावणी केली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात आम्ही दोन महिन्यांचे पैसे टाकले आहेत. खात्यात पैसे टाकल्याने विरोधक चक्रावले आहेत, त्यांचे तोंड काळे झाली आहेत, बुरी नजर वाले तेरा मुंह काला या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सडकून टीका केलीयं.

अजित पवारांना धक्का; नागवडे महायुतीमधून बाहेर, अपक्ष विधानसभेच्या मैदानात उतरण्याचे संकेत

महायुतीचं सरकार आल्यास दोन हजार देणार…
महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीयं. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये बोलत होते.

follow us