वंचितची 5वी यादी जाहीर! श्रीगोंद्यात मोठा मोहरा मिळाला; अण्णासाहेब शेलारांना उमेदवारी
Maharashtra Assembly elections : वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर झालीय. यामध्ये 16 जणांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. वंचितची यादी जाहीर झाल्यामुळे श्रीगोंद्यात मोठा मोहरा मिळाला (Maharashtra Assembly elections) आहे. श्रीगोंद्यात माळी समाजाचे अण्णासाहेब शेलार यांना उमेदवारी मिळाली आहे. ते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष होते. तर भाजपने प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिलेली आहे.येथून महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप हे इच्छुक आहे. त्यांना उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे या मतदारसंघात शेलार, पाचपुते आणि जगताप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
भाजप पाठोपाठ आता राज ठाकरेंकडून उमेदवारांची घोषणा, राजू पाटील अन् अविनाश पाटील आखाड्यात…
वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत X सोशल मीडिया अकाउंंटवरून उमेदवारांच्या नावाची पाचवी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. महायुतीकडून बारामतीमध्ये अजित पवार मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी प्रचाराला देखील सुरूवात केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीने मंगलदास निकाळजे यांना बारामतीतून तिकीट दिलेलं आहे.
वंचितच्या पाचव्या यादीत भुसावळ, मेहकर, मूर्तिजापूर, रिसोड, ओवळा माजिवहा, ऐरोली, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, मालाड, अंधेरी पू्र्व, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, चेंबूर, बारामती, श्रीगोंदा, उदगीर या मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपचे 99 उमेदवार फायनल झाले असून कालच यासंदर्भात अधिकृत घोषणा देखील त्यांनी केलीय. आता महाविकास आघाडी आपल्या कोणत्या शिलेदारांना मैदानात उतरवते? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
ते एक बापाची औलाद नाही, ‘मविआ’ सोडणार का?, संजय राऊतांनी सगळं पिक्चरचं क्लियर करून टाकलं
The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its fifth list of candidates for the Maharashtra Assembly elections. #MaharashtraAssembly2024 #VoteForVBA #VoteForGasCylinder pic.twitter.com/nATZWWIWoE
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 21, 2024
वंचितच्या 5 व्या यादीत कोणाला उमेदवारी ?
भुसावळ -जगन देवराम सोनवणे
मेहकर- डॉ. ऋतुजा चव्हाण बौद्ध
मूर्तिजापूर- सुगत वाघमारे बौद्ध
रिसोड -प्रशांत सुधीर गोळे
ओवळा माजिवहा -लोभसिंग गणपतराव राठोड
ऐरोली -विकांत दयानंद चिकणे
जोगेश्वरी पूर्व – परमेश्वर रणशुर बौद्ध
दिंडोशी- राजेंद्र तानाजी ससाणे
मालाड -अजय आत्माराम रोकडे
अंधेरी पूर्व -अॅड. संजीवकुमार कलकोरी
घाटकोपर पश्चिम -सागर रमेश गवई
घाटकोपर पूर्व -सुनिता गायकवाड
चेंबूर -आनंद भीमराव जाधव बौद्ध
बारामती -मंगलदास तुकाराम निकाळजे
श्रीगोंदा -अण्णासाहेब शेलार
उदगीर -प्रा. डॉ. शिवाजीराव मरेप्पा देवनाळे