Download App

त्यांना कशाला घेता, आम्हीच भाजपसोबत येतो, ठाकरेंचा दिल्लीत फोन; CM शिंदेचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरेंनी दिल्लीला फोन करून त्यांना कशाला घेता, त्यापेक्षा आम्हीच तुमच्यासोबत येतो, अशी ऑफर ठाकरेंनी भाजपला दिल्याचा दावा शिंदेंनी केला.

  • Written By: Last Updated:

Eknath Shinde On Uddhav Thackeray : जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेत (Shiv Sena) बंड करून भाजपसोबत (BJP) हातमिळवणी केली होती. चाळीसहून अधिक आमदारांना सोबत घेऊन शिंदेंनी हे बंड केल्यानं मविआला मोठा धक्का बसला होता. दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde ) मोठा गौप्यस्फोट केला.

उज्ज्वल निकम भाजपचे उमेदवार, प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘माणूस म्हणून…’ 

उद्धव ठाकरेंनी दिल्लीला फोन केला होता. त्यांना कशाला घेता, त्यापेक्षा आम्हीच तुमच्यासोबत येतो, अशी ऑफर ठाकरेंनी भाजपला दिल्याचा दावा शिंदे यांनी केला.

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना शिंदे म्हणाले, आम्ही सुरतला लपूनछपून नाही तर  खुलेआमपणे आणि जाहीरपणे गेलो होतो. राहिला प्रश्न परत बोलावण्याचा तर आम्हाला परत बोलवायचे आणि आमचे पुतळे जाळायचे, पक्षातून हकालपट्टी करायची असा प्लॅन होता, असं शिंदे म्हणाले. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी दिल्लीला फोन केला होता. त्यांना कशाला घेता, त्यापेक्षा आम्हीच तुमच्यासोबत येतो, अशी ऑफर उद्धव ठाकरेंनी भाजपला दिल्याचा दावाही शिंदेंनी केला.

बॅक-टू-बॅक 34 सिनेमे फ्लॉप; अखेर अक्षयच्या ‘वेलकम टू जंगल’मध्ये अभिनेता बनणार सुपरस्टार 

पुढं बोलतांना शिंदे म्हणाले, काँग्रेसच्या दावणीला बांधलेल्या शिवसेनेला वाचवण्यासाठी आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण होण्यापासून रोखण्यासाठी आम्ही हे धाडसी पाऊल उलचलं, त्यासाठी हिंमत लागतेय. आणि ती हिंमत आम्ही दाखवल्याच शिंदे म्हणाले.

यावेळी शिंदे यांना तुम्ही भाजपसोबत खुश आहात का? असा प्रश्न विचाला त्यावर शिंदे म्हणाले, भाजपसोबत आमची अनेक वर्षांपासून वैचारिक युती होती. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे ही युती झाली. आम्ही तीच युती केली. ही युती उद्धव ठाकरेंनी तोडली होती, त्यांची चूक आम्ही सुधारल्याचं शिंदे म्हणाले.

पन्नास खोके, एकदम ओके अशी आमच्यावर टीका केली जातेय. पण, मला सत्ता आणि पैशाचा मोह नाही. पैशाचा लोभी कोण? खोक्याचा मोह कुणाला ? लोकांना हे माहीत आहे. मला संधी मिळाली. त्याचं मी सोनं करतोय, असंही शिंदे म्हणाले.

 

follow us

वेब स्टोरीज