Download App

CM Eknath Shinde म्हणाले, कोश्यारी यांनी चांगलं काम केलं

पुणे : कोश्यारींना विमानातून कोणी उतरविले? महाविकास आघाडीचे सरकार असताना दबावात काम करावे लागत होते, असा आरोप माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari)यांनी केला. त्यानंतर महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi)मंत्री म्हणून कोश्यारी यांच्यावर दबाव होता का, अशी विचारणा पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली असता त्यांनी त्यावर जास्त भाष्य करणं टाळलं. कोश्यारी यांनी चांगलं काम केलं. त्यांना विमानातून कोणी उतरवलं? हे सर्वांना माहिती आहे, असं यावेळी त्यांनी सांगितलं.

Sonu Nigam : ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलाकडून सोनू निगमला धक्का-बुक्की ? व्हिडीओ व्हायरल

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan)यांच्या तक्रारीबाबत चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरविली जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र दिलं आहे. नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा, असं सांगण्यात आलंय. विद्यार्थ्यांच्या भूमिकेला सरकारचा पाठिंबा असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Tags

follow us