Download App

महायुतीला धाकधुक, विधानसभा निवडणुका घेण्याचं धाडस नाही…; कॉंग्रेसचे टीकास्त्र

हायुती सरकारला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घेण्याचं धाडस का करता आलं नाही?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

  • Written By: Last Updated:

Vidhansabha Election : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. मात्र, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) कार्यक्रम जाहीर केला नाही. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकारसह राज्यातील महायुत (Mahayuti) सरकारवर टीका केली जात आहे.

UPSC Recruitment : 45 पदांसाठी थेट भरती अन् लाखात पगार; खाजगी नोकदारही करू शकणार अर्ज 

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यानंतरही महायुती सरकारला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घेण्याचं धाडस का करता आलं नाही?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

सावंत यांनी आज महायुती सरकावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, महायुतीमधील लोक विरोधकांचा सावत्र भाऊ असा उल्लेख करत आहेत. मात्र, त्यांनीच सावत्रपणाची वागणूक दिली. आता ते बहिणींना लाडकी म्हणत आहेत. पण, त्यांनीच महागाईमुळं बहिणींना सावत्रपणाची वागणूक दिल्याची टीका सावंत यांनी केली.

महायुतीचे हे सरकार बिल्डरधार्जिणे
पुढं ते म्हणाले, राज्यातील महायुतीचे हे सरकार बिल्डरधार्जिणे झाले असून गिरगावात तर मंदिर बिल्डरसाठी हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई पालिकेकडून सव्वा लाख कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्याची यादी का दिली जात नाही, असा आरोपही सावंत यांनी केली.

Bigg Boss Marathi: ‘आतमध्ये वैभव पाठवलाय गद्दार म्हणून…’; रितेश भाऊनी थेट सुनावलं

दरम्यानच्या काळात राज्यता काही हिंसाचाराच्या घटना घडल्या. यावरून सावंत यांनी सरकावर टीका केली. ते म्हणाले, राज्यातील महायुतीची सत्ता येत्या काळात जाणार आहे. सरकारची धाकधुक वाढली. त्यामुळे मुंबई पेटवण्याचा प्रयत्न होत आहे. नाशिकमध्ये, विशालगडमध्येही अशाच घटना घडत आहेत. साम, दाम, दंड भेद हे सर्व पर्याय अवलंबले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडून फेक नरेटिव्ह पसवरण्यात येत आहे. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अर्धा ट्रिलियन डॉलरची झाली. पण 2015 मध्ये फडणवीस अमेरिका दौऱ्यात म्हणाले होते की, 2025 साली महाराष्ट्र 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था करू…. मग आता अर्धा ट्रिलियन झाले तर हे अपयश कोणाचे आहे, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. आपला विकास दर 7.85 टक्के होता. तो तुम्ही गाठू शकत नाही. महाराष्ट्र मागे गेला याचे पाप तुमचेच आहे, अशी टीका सावंत यांनी केली.

follow us