महाराष्ट्राच्या विधानसभांना सणांचा ‘खो’; आयोगाने वाचून दाखवली संपूर्ण यादी
Vidhansabha Election : लोकसभेनंतर आता राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election) वारे वाहू लागले. काही दिवसांतच राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, आता या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली. जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) जाहीर केल्या. मात्र, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय पुरस्कारात हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांचा डंका; मराठी चित्रपटसृष्टीकडून घोर निराशा
केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबरपासून विधानसभा निवडणुकांना सुरुवात होणार असून तीन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. तर हरियाणात 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
बहिणींना खुश केलं, शेतकऱ्यांच काय? तनपुरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांविषयी बोलतांना ते म्हणाले, याआधी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. यापूर्वी 3 निवडणुका एकत्र होत होत्या. यावेळी 4 राज्यांच्या निवडणुका आहेत. आम्ही 2-2 राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात पाऊस पडला. त्यामुळे अनेक गोष्टी बाकी आहेत. शिवाय, काही दिवसांमध्ये अनेक सण-उत्सव आहे. गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी हे सण पुढील काही दिवसांत आहेत. त्यामुळं हे या सण संपल्यानंतर महाराष्ट्रात निवडणूका होतील, असं आयुक्त राजीव कुमार म्हणाले.
तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यात आल्या नसल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयुक्तांनी दिलं. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचे संकेत आहेत.