राष्ट्रीय पुरस्कारात हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांचा डंका; मराठी चित्रपटसृष्टीकडून घोर निराशा

राष्ट्रीय पुरस्कारात हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांचा डंका; मराठी चित्रपटसृष्टीकडून घोर निराशा

70th National Film Awards: 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. (National Film Award) दरवर्षी सर्व भाषांमधील सर्वोत्कृष्ट सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येतं. (Marathi Movies) राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातात. गेल्या वर्षी एकदा काय झाले या मराठी सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार मिळाला होता. यंदा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठी ‘वाळवी’ (Vaalvi Marathi Movie) या सिनेमाची निवड करण्यात आली आहे. मात्र या पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीकडून निराशा व्यक्त केली जात आहे.


यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटासोबत, तामिळ, कन्नडा, हरयाणवी, गुजराती भाषेतील चित्रपटांच वर्चस्व पाहायला मिळाला आहे. तर -साहिल वैद्य यांच्या ‘मर्मर्स ऑफ द जंगल बेस्ट डॉक्यु्मेंटरी पुरस्कार मिळाले आहे, डॉक्युमेंटरी आणि वैशिष्ट्य नसलेली श्रेणी ‘आणखी एक मोहेनजोदारो’ या सिनेमाला बेस्ट बायोग्राफिकल हिस्टोरिकल कम्पायलेशन फिल्म कॅटेगरीत अवॉर्ड देण्यात आला आहे.

परेश मोकाशी यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘वाळवी’ सिनेमाला यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार चित्रपटांमध्ये तीन मराठी सिनेमांनी बाजी मारली आहे. ‘वाळवी’बरोबरच आणखी दोन मराठी सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ या मराठी सिनेमाला बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्मचा अवॉर्ड मिळाला आहे. ‘वारसा’ या माहितीपटाला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

70th National Film Award: ‘कांतारा’ची यशस्वी घोडदौड! दोन राष्ट्रीय पुरस्कारावर उमटवली मोहोर

दरम्यान, ‘वाळवी’ हा सिनेमा 13 जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे, अनिता दाते, सुबोध भावे अशी या सिनेमाची स्टारकास्ट होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही जोरदार कमाई केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube