पवारांना सर्वांची नावे तोंडपाठ, फक्त 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देणाऱ्यांची नावं विसरले; पडळकरांचा टोला

पवारांना सर्वांची नावे तोंडपाठ, फक्त 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देणाऱ्यांची नावं विसरले; पडळकरांचा टोला

Gopichand Padalkar on Sharad Pawar for his statement about Those who guarantee to win 160 seats in Maharashtra Vidhansabha : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एक विधान केलं होतं. त्यावर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. हे प्रकरण नेमकं काय, पडळकर आणि शरद पवार नेमकं काय म्हणाले होते पाहुयात…

जरांगेंच्या मनधरणीसाठी भाजपने दोन डाव टाकले; एकाची पोस्ट तर, दुसरा थेट भेटीला

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

शरद पवार असे एकमेव व्यक्ती आहेत. ज्यांना कोणत्याही गावातील सर्वांची नावे माहीत असतात. पण ज्या दोघांनी शरद पवारांना 160 आमदार निवडून आणून देतो. असे भेटून सांगितले होते. असे शरद पवार म्हणतात. त्या दोघांची फक्त नावे पवार विसरलेत. बाकी सर्वांची नावे शरद पवारांना आठवतात. असे म्हणत शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावर आमदार गोपीचंद पडळकरांनी टोला लगावलाय. एका कार्यक्रमात आयोजकांचे कौतुक करताना पडळकर यांनी हे शरद पवारांवर वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.

भयंकर! तोंडात जिलेटीन रॉडचा स्फोट करत…प्रियकराने केली तरुणीची हत्या; कर्नाटकात प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट

शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?

गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार म्हणाले होते की, मला आठवतंय विधान सभेच्या निवडणुकांपूर्वी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले होते. तो दोघे जण होते. त्यांची नावं पत्ते आता माझ्याकडे नाहीत. त्यांनी मला सांगितलं होतं की, महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 जागा आहेत. आम्ही तुम्हाला त्यापैकी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. मला अश्चर्य वाटलं. स्पष्ट सांगायचं म्हणजे मला निवडणूक आयोग या संस्थेबद्दल यत्किंचितही शंका नव्हती. असे लोक भेटत असतात. पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर मी त्या लोकांची राहुल गांधींसोबत भेट घालून दिली. त्यांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींसमोर म्हटलं. पण माझं आणि राहुल गांधी याचं मत असं होतं की, यामध्ये आपण लक्ष देऊ नये. हा आपला रस्ता नाही. आपण लोकांमध्ये जाऊ. लोकांचा जो निर्णय असेल तो स्विकारू. असं म्हणत पवारांनी निवडणुका कशा जिंकल्या जातात यामध्ये काही लोक कसे काम करतात याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता.

मोठी बातमी! आशिया कप स्पर्धेतील सर्व सामने मोफत; हॉकी इंडियाचा मोठा निर्णय

मात्र या दोन लोकांची नावं त्यांनी स्पष्ट सांगितली नव्हती. त्यानंतर अनेकांना त्या लोकांच्या नावांबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. मात्र असे लोक जर खरंच भेटले होते. तर त्यांची नावं पवारांना कशी काय आठवत नाहीत. जेव्हा की, त्यांना कोणत्याही गावातील सर्व लोकांची नावं तोंडपाठ असतात. असं म्हणत पडळकरांनी त्यांना टोला लगावला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube