Bigg Boss Marathi: ‘आतमध्ये वैभव पाठवलाय गद्दार म्हणून…’; रितेश भाऊनी थेट सुनावलं

Bigg Boss Marathi: ‘आतमध्ये वैभव पाठवलाय गद्दार म्हणून…’; रितेश भाऊनी थेट सुनावलं

Bigg Boss Marathi New Season: ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi ) भाऊच्या धक्क्यावर महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख (Riteish Deshmukh) घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे. ‘आम्ही आतमध्ये वैभव पाठवलाय गद्दार म्हणून बाहेर पडू नका’, असं म्हणत भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी थेट वैभव चव्हाणला (Vaibhav Chavan) सुनावलं आहे.

 

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या (Bigg Boss Marathi New Season) भागात रितेश म्हणतोय, (Bigg Boss Marathi New Promo) बॉर्डरवरचा सैनिक समोरच्या सैनिकावर गोळ्या झाडण्यापेक्षा आपल्या सैनिकावर गोळ्या झाडतो याला काय म्हणतात?. त्यावर घरातील सदस्य फितूर, शत्रू, धोकेबाज, गद्दार असं म्हणतात. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या टास्कमध्ये वैभवने गद्दारी केलेली दिसून आली आहे. त्यामुळे रितेशने त्याची चांगलीच हजेरी घेतली आहे.

रितेश वैभवला म्हणतो, बोलायला जिगर लागते. ही जिगर बाजारात प्रोटीनच्या डब्ब्यात मिळत नाही. ही जिगर तुमच्यात दिसत नाही. इथून पुढे तुमच्यावर कोणी विश्वास का ठेवायचा. तुमच्या आत आहे तेच बाहेर दिसणार आहे. प्रेक्षकांच्या नजरेत तुमचा गेम ओव्हर झालाय..मला बघायचंय ही मैत्री कधीपर्यंत टिकते. आम्ही आतमध्ये वैभव पाठवलंय गद्दार म्हणून बाहेर पडू नका. असं थेट सुनावलं आहे.

कॅप्टनसी टास्कमध्ये निक्की अन् योगिता भिडल्या

आजच्या भागात कॅप्टनसीचा टास्क पार पडताना पाहायला मिळणार आहे. या कॅप्टनसी टास्कमध्ये निक्की (Nikki) आणि योगिता (Yogita) एकमेकांसोबत भिडताना दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’ च्या कॅप्टनसी टास्कमध्ये निक्की अन् योगिता भिडल्या; कोण होणार कॅप्टन

नॉमिनेशन टास्क असो वा कॅप्टनसीचा…

कोणत्याही टास्कमध्ये सदस्यांमध्ये चांगलीच चढाओढ पाहायला मिळते. आजच्या भागाच्या कॅप्टनसी टास्कदरम्यानचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की आणि योगिता आमने-सामने येऊन टास्कमध्ये टक्कर देताना दिसत आहेत. आजच्या भागात टीम B मधील सदस्य गार्डन एरियामध्ये गेम प्लॅनबद्दल भाष्य करताना दिसणार आहेत. ‘बिग बॉस मराठी’चा आजचा कॅप्टनसी टास्क खूपच रंगतदार असणार आहे. कोण होणार ‘बिग बॉस मराठी’चा नवा कॅप्टन याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube