Rahul Narwekar : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan)यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा (resignation)दिला आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आणि विधानसभा अध्यक्षांनी अशोक चव्हाण यांचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती दिली आहे. आणि त्यासंदर्भातले गॅझेट नोटिफिकेशन देखील जारी केले असल्याचे अध्यक्ष नार्वेकर यांनी सांगितले आहे. मुंबईमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांच्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली.
अशोक चव्हाणांच्या भाजप एंट्रीने शिंदे, अजितदादांचे पंख छाटले ! राज्याचे गणित कसे बदलणार ?
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी काही कॉंग्रेस आमदारांनी राजीनामा दिल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावरुन नार्वेकरांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सांगितले की, याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नाही. आणि अद्याप आपल्याकडे दुसऱ्या कोणत्याही कॉंग्रेस आमदाराचा राजीनामा आलेला नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
बारा बलुतेदारांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार; CM शिंदेंची ग्वाही
त्याचवेळी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवलं जाणार होतं, मात्र त्यासंदर्भात अद्यापही राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून कोणत्याही प्रकारची सूचना मिळाली नसल्याचे यावेळी राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.
अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर ते नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच नांदेडमधील चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर भावी खासदार असे स्टेटस ठेवल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी कॉंग्रेस सोडून आता भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चा होत्या परंतु काही तासांमध्येच अशोक चव्हाण यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
त्यामुळे तुर्तास तरी अशोक चव्हाण यांनी आपल्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. असं असलं तरी आगामी दोन दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी त्यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाल्या आहेत.