अशोक चव्हाण यांची भाजपमध्ये एंट्री ? शिंदे, अजितदादांचे पंख छाटले ! राज्याचे गणित कसे बदलणार ?

  • Written By: Published:
अशोक चव्हाण यांची भाजपमध्ये एंट्री ?  शिंदे, अजितदादांचे पंख छाटले ! राज्याचे गणित कसे बदलणार ?

पुणे : काँग्रेसचे मोठे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आमदारकी व काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अद्याप भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट केलेले नाही. परंतु राजकीय परिस्थितीनुसार ते भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याचे फिक्स आहे. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे काही आमदारही येणार आहेत. ही आमदाराची संख्या अद्याप निश्चित नसले तरी पंधरा ते सतरा आमदार तरी त्यांच्याबरोबर येतील. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेनेबरोबर काँग्रेसही फुटणार आहे. राज्यातील राजकीय गणित खूपच बदलणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व अजित पवार यांचे (Ajit Pawar) टेन्शन वाढले आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व त्यांना मानणारे काही आमदार हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून होती. नांदेडचे भाजप खासदार प्रताप चिखलीकर यांनी अनेकदा माध्यमांसमोर हे बोलून दाखविले. भाजपचे इतर नेतेही तसेच खासगीत सांगत होते. पण अशोक चव्हाण हा दावा खोडून काढत होते. पण आज अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्याने हे खरे ठरले. ते 15 फेब्रुवारीला गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश करतील. देवेंद्र फडणवीस व भाजपचे केंद्रीय नेत्यांनी शिवेसना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडत उद्धव ठाकरे व शरद पवारांना धक्के दिले. राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे व इतर चाळीसह आमदार फुटले. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार हे सत्तेत आलेत. आता राज्यात केवळ काँग्रेस एकसंध राहिलेले बोलले जात होते. परंतु आता काँग्रेस फुटल्याचे निश्चित झाले आहे.

चर्चेला पूर्णविराम! युपीमध्ये ‘इंडिया’ आघाडीला भगदाड; आरएलडीचे जयंत चौधरींचा एनडीएत प्रवेश

अजितदादांना शह ! भाजपचा मुख्यमंत्री करायचाय
अशोक चव्हाण हे भाजपवासी होणार आहेत. त्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदे यांना भाजपने बरोबर घेत सत्ता स्थापन केली आहे. भाजप 105 आणि एकनाथ शिंदेंबरोबर आलेले शिवसेनेचे आमदार आणि काही अपक्ष मिळून 50 आमदारांची संख्या होत आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा 155 असताना अजित पवारांना बरोबर घेण्यात आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चाळीस आमदार धरून दोनशेहून अधिक आमदारांचे संख्याबळ झाले आहेत. तरी भाजपला अशोक चव्हाण व त्यांच्याबरोबर येणाऱ्या आमदारांना घेण्याचा गरज काय आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचे उत्तर आहे 2024 चे मुख्यमंत्रीपद. अशोक चव्हाणांना बरोबर घेतल्याने मुख्यमंत्रिपदावर डोळा ठेवून असलेल्या अजित पवारांना भाजपने धक्का दिला आहे. तर भाजपला आता कोणत्याही परिस्थिती आपला मुख्यमंत्री करायचा आहे. अशोक चव्हाणांचा फायदा उठवून भाजपला सर्वाधिक आमदार निवडून आणून आपला मुख्यमंत्रिपद करायचा आहे. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. 2024 ला सर्वाधिक जागा निवडून आल्यानंतर अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास भाजपचे आमदार तयार होणार नाहीत. तर भाजपला एकनाथ शिंदे व अजित पवारांवर अंवलबून न राहता, आपले संख्याबळ वाढावयचे आहे. त्यासाठी अशोक चव्हाण हे उपयोग पडणार आहेत.

लोकसभा व विधानसभेचे गणित बिघडणार

अशोक चव्हाण यांना भाजपने बरोबर घेतल्यास लोकसभा व विधानसभेचे गणित बिघडणार आहेत. त्याचा फटका एकनाथ शिंदे व अजित पवारांना बसणार आहे. त्यांना वेळ आल्यास कमी जागा घेऊन लढावे लागणार आहे. लोकसभेच भाजपला घवघवीत यश आल्यास विधानसभेचे गणित आणखीच बिघडतील. त्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा विधानसभेला कमी जागा मिळतील. त्यातून दोघांचे महत्त्व आपोआप कमी होईल. तसेच आता होत असलेल्या राज्यसभेचे गणितही बिघडणार आहे. तसेच नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे चार आमदार आहेत. त्यातील तिघे अशोक चव्हाणांबरोबर आहेत. तसेच हिंगोलीत अशोक चव्हाणांचा प्रभाव आहे. त्यामुळे येथील दोन लोकसभा जागा भाजपसाठी सोप्या जातील. तसेच अशोक चव्हाणांबरोबर आलेले आमदारही निवडून येण्याच्या ताकदीचे आहेत.

आश्वासक मराठा चेहरा

भाजपकडे आश्वासक मराठा चेहरा नाही. मनोज जरांगेंच्या आरक्षणाच्या आंदोलनाला भाजपकडून कोण समोर जायचे हा प्रश्न भाजपला पडला होता. त्यामुळे एक आश्वासक व गंभीर विचार करणारा नेता भाजपला हवा होता. तो अशोक चव्हाणांच्या रुपाने मिळणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज